श्वेता तिवारीची मुलगी पलकच्या गाण्यावर मोनालिसाचा भन्नाट डान्स, बंगाली लूकने चाहत्यांना केले दंग


भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री मोनालिसाला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. मोनालिसाने हिंदी चित्रपटापासून भोजपुरी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. टेलिव्हिजनच्या दुनियेतील ती एक चमकता तारा आहे. अभिनयासोबतच मोनालिसा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मोनालिसा नुकतीच पती विक्रांत सिंग राजपूतसोबत मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गोव्याला गेली होती. त्यांचे हे मित्र दुसरे तिसरे कोणी नसून, अभिनेत्री पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा होते. त्यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते आणि आता त्यांनी बंगाली रीतिरिवाजांनुसार दुसरे लग्न केले आहे. मोनालिसा पती विक्रांतसोबत लग्नाच्या कार्यक्रमात पोहोचली होती. अशा परिस्थितीत, आता या कार्यक्रमातील तिचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती श्वेता तिवारीची मुलगी पलकच्या ‘बिजली बिजली’ या पहिल्या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

पूजा बॅनर्जीच्या लग्नाच्या सोहळ्यामधून व्हायरल होत असलेला मोनालिसाचा डान्स व्हिडिओ, तिनेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिचा बंगाली लूक पाहायला मिळत आहे. यामध्ये ती एका व्यक्तीसोबत डान्स मूव्ह्ज दाखवत आहे आणि अभिनेता कुणाल वर्मा तिचा एक व्हिडिओ बनवत आहे, जो मोनालिसाने शेअर केला आहे. यामध्ये ती गाण्याची हुक स्टेप अगदी सोप्या पद्धतीने करत आहे. तिचा लूक आणि डान्स दोन्ही चाहत्यांना आवडत आहे. यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत २३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडिओ शेअर करताना मोनालिसाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बिजली बिजली… मला असे अनेक प्रॅक्टिस व्हिडिओ आवडायचे. रजितदेव आहे ना?… प्रॅक्टिस तुम्हाला परिपूर्ण बनवते. हा व्हिडिओ शूट केल्याबद्दल नवरदेव कुणाल वर्माचे आभार.”

‘बिजली बिजली’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर श्वेता तिवारीची मुलगी पलकने यातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. हा तिचा पहिला म्युझिक व्हिडिओ आहे, जो हार्डी संधूसोबत तिच्यावर चित्रित करण्यात आला आहे. हे गाणेही हार्डीने गायले आहे. याला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनाही हे गाणे खूप आवडले. इतकंच नाही, तर पलक तिवारीचा बोल्ड लूक यामध्ये पाहायला मिळाला आणि त्याला खूप पसंती मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एवढं महाग! राजकुमारने लग्नात पत्रलेखाला घातले तब्बल ‘इतक्या’ लाखांचे मंगळसूत्र, सर्वत्र रंगलीय चर्चा

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-श्वास रोखून धरा! करणच्या पहिल्या ऍक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार सिद्धार्थ, पाहा फर्स्ट लूक


Latest Post

error: Content is protected !!