Monday, July 1, 2024

नम्रता शिरोडकरचा लग्नाच्या 17 वर्षांनंतर केला खुलासा; सांगूनच टाकले, का सोडावी लागली इंडस्ट्री

बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नासाठी किंवा लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला. या अभिनेत्रींमध्ये नम्रता शिरोडकर हिच्या नावाचाही समावेश होतो. नम्रताने तिच्या कारकीर्दीत अनेक हिंदी सिनेमात काम केले आहे. तिने ‘वास्तव’ सिनेमात संजय दत्त याच्यासोबत काम केले होते. या सिनेमासाठी आजही तिला ओळखले जाते. तिने फक्त संजय दत्तच नाही, तर अनेक बॉलिवूड सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. मात्र, कारकीर्दीच्या शिखरावर असताना तिने लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. लग्नानंतर तिने सिनेसृष्टी कायमची सोडली होती. आता 17 वर्षांनंतर तिने याबाबत खुलासा केला आहे.

नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) हिने सन 2005मध्ये साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याच्यासोबत लग्न केले होते. लग्न करताच तिने सिनेसृष्टीचा मार्ग कायमचा सोडला. नुकत्याच एका मुलाखतीत नम्रताने सांगितले आहे की, पती महेश बाबूमुळेच तिने अभिनयाला अलविदा केला होता. इतकंच नाही, तर महेशने तिच्यापुढे अट ठेवली होती की, जर तिला लग्न करायचे असेल, तर तिला अभिनय सोडावा लागेल.

नम्रता म्हणाली की, “महेश याबाबतीत खूपच स्पष्ट होता. त्याला काम करणारी पत्नी नको होती. जर मी कोणत्याही ऑफिसमध्ये काम करत असते, तरीही त्याने मला काम सोडण्यासाठी सांगितले असते. अशाप्रकारे अनेक गोष्टी होत्या, ज्या आम्हाला एकमेकांकडून पाहिजे होत्या.” पुढे बोलताना नम्रता म्हणाली की, “आम्ही खूपच स्पष्ट होतो की, आम्ही लग्नानंतर आधी एका फ्लॅटमध्ये राहणार. कारण, मी मुंबईची होते आणि मला माहिती नव्हतं की, मी इतक्या मोठ्या बंगल्यात कशी काय फिट होईल. माझी अशी अट होती की, जर आम्ही हैदराबादला शिफ्ट होऊ, तेव्हा मी फ्लॅटमध्ये राहणार. त्यामुळे तोदेखील माझ्यासोबत फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)

“अशाप्रकारे तोदेखील स्पष्ट होता की, त्याला वाटत नव्हते की, मी काम केले पाहिजे. त्यामुळे आम्ही थोडा वेळ घेतला, जेणेकरून मी माझ्या सर्व सिनेमांच्या शूटिंग पूर्ण करू शकेल. जेव्हा आमचे लग्न झाले, तेव्हा माझ्याकडे काहीच काम नव्हते. त्यामुळे मी माझ्या सर्व सिनेमांचे काम संपवले. आम्ही स्पष्ट होतो. आमच्यात खूपच स्पष्टता होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)

नम्रता हिच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तिने एकूण 29 सिनेमात काम केले. त्यामध्ये ‘पुकार’, ‘हेरा फेरी’, ‘आघाज’, ‘अस्तित्व’, ‘अलबेला’, ‘तेरा मेरा साथ रहें’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘मसीहा’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. (actress namrata shirodkar reveals mahesh babu was very clear that he wanted a non working wife)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संतापजनक! घरभाड्याच्या बदल्यात नगरसेवकाने तेजस्विनीकडे केलेली घाणेरडी मागणी, अभिनेत्रीने पुढे…
अर्जुन अन् तब्बूच्या ‘कुत्ते’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, राधिका मदानच्या हॉटनेसने वेधले लक्ष; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा