Monday, June 24, 2024

नर्गिस फाखरीने इंडस्ट्रीतील लैंगिक शोषणावर तोडले मौन; म्हणाली, ‘लोक तुमच्यासोबत…’

नर्गिस फाखरीला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही. ती एक दशकाहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे. तिने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात आपले बळकट स्थान निर्माण केले. नर्गिस फाखरीने 2011 मध्ये इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार‘ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. यानंतर ती ‘मद्रास कॅफे‘, ‘फटा पोस्टर निकला हीरो‘, ‘किक‘ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. नर्गिसने अलीकडेच तिच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल सांगितले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान नर्गिस (nargis fakhri) हिने बॉलिवूडमध्ये आलेल्या चढ-उतारांबद्दल सांगितले. यावेळी ती बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाबाबतही बोलली. लैंगिक छळातून बाहेर आल्यावर नर्गिस म्हणाली, “मी इतरांना न्याय देत नाही. प्रत्येकाने त्याला हवे तसे केले पाहिजे. लाेक असे म्हणता की, इथे सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट हे तत्व लागू आहे, पण मी त्यासाठी काहीही करायला तयार असेल असे नाही.”

नर्गिस फाखरी पुढे म्हणाली, “माझ्यासाठी माझे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सर्वात महत्वाचे आहे. मी कोण आहे हे मला माहीत आहे आणि मला स्वतःमध्ये आनंदी राहायचे आहे. अशा परिस्थितीत, मला मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही.”

नर्गिस पुढे म्हणाली, “मी नशीबवान आहे की, माझ्याकडे अशा भयपट कथा नाहीत जश्या इतर लोकांकडे असू शकतात. पण, इथे लोक फ्लर्ट करतात आणि तुमच्यावर दबाव आणतात. त्यांच्या तुमच्याकडे अधिक मागण्या असतात, पण मी अश्या लाेकांमध्ये माेडते ज्या स्वतःला घरात कोंडून ठेवतात. या सगळ्यापासून मी स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते. मला माझ्या सीमा कशा सेट करायच्या हे माहित आहे.”

नर्गिस फाखरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नर्गिस नुकतीच ‘शिव शास्त्री बलबोआ’मध्ये दिसली होती. यामध्ये तिने अनुपम खेर आणि नीना गुप्तासोबत स्क्रीन शेअर केली.(bollywood actress nargis fakhri up facing harassment in bollywood says i just get away from everybody)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बिग बॉस 16’ फेम अर्चना गौतम एकेकाळी करायची सिलेंडर पोहचवण्याचे काम

‘हा तर फक्त एक नेता आहे’ निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया

हे देखील वाचा