‘द मॅट्रिक्स’च्या पोस्टरमधून प्रियांका चोप्रा आऊट, पाहून चाहतेही झाले निराश, म्हणाले, ‘तू कुठे आहेस?’


बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा हॉलिवूड चित्रपट ‘द मॅट्रिक्स रेजरेक्शन्स’च्या माध्यमातून जगावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाली आहे. आता प्रियांका चोप्राने ‘द मॅट्रिक्स रेजरेक्शन्स’चे पोस्टर शेअर केले आहे. मॅट्रिक्स चित्रपट सीरिजचा हा चौथा चॅप्टर आहे.

पोस्टर शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, “’द मॅट्रिक्स रेसररेक्शन्स’च्या या नवीन पोस्टरसह मॅट्रिक्समध्ये परत या. या ख्रिसमसला चित्रपटगृहात आणि एचबीओ मॅक्सवर पाहू शकतो.” प्रियांका चोप्राच्या पोस्टरमध्ये कॅरी-ॲनी मॉस, जाडा पिंकेट स्मिथसह आंतरराष्ट्रीय कलाकार केनू रीव्हज आहेत.

https://www.instagram.com/p/CWYmAW1vFgD/?utm_source=ig_web_copy_link

पोस्टरमधून प्रियांका बाहेर
प्रियांकाचे देसी चाहते ती पोस्टरमध्ये नसल्याचे पाहून निराश झाले आहेत. या पोस्टवर प्रियांकाचे चाहते तिला विचारत आहेत की, “तू कुठे आहेस, पोस्टरमध्ये नाही?” प्रियांकाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिला ट्रेलर प्रदर्शित केला. या ट्रेलरमध्ये प्रियांकाच्या एका झलकमधील लूक चाहत्यांना पसंत पडत आहे.

‘हा’ चित्रपट २२ डिसेंबरला होणार प्रदर्शित
त्याचबरोबर हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रियांका सध्या बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही चित्रपट करत आहे. बॉलिवूडमध्ये ती ‘द व्हाईट टायगर’ आणि ‘द स्काय इज पिंक’मध्ये दिसली होती. यासोबतच ती शेवटची हॉलिवूड फिल्म ‘वी कॅन बी हिरोज’मध्ये दिसली होती. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच प्रियांकाचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. ‘पर्पल पेबल्स पिक्चर्स’ असे तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. या प्रोडक्शन हाऊसच्या अंतर्गत ‘व्हेंटिलेटर’, ‘पाहुना’, ‘फायरबँड’, ‘पानी’, ‘द स्काय इज पिंक’, ‘द व्हाईट टायगर’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.

पहिला चित्रपट १९९९ मध्ये झाला होता प्रदर्शित
‘द मॅट्रिक्स रेसररेक्शन्स’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर या चित्रपट फ्रँचायझीचे मुख्य पात्र निओ आणि ट्रिनिटी दिसत आहेत, पण हा चित्रपट सस्पेन्स, ऍक्शन आणि थ्रिलने भरलेला आहे. या फ्रँचायझीचा पहिला चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘द मॅट्रिक्स रेसरेक्शन्स’चा ट्रेलर प्रेक्षकांना बांधून ठेवणारा आहे.

जर तुम्ही बाकीचे भाग पाहिले असतील, तर ट्रेलरचे संवाद समजायला तुम्हाला वेळ लागणार नाही. प्रियांका चोप्राने गेल्या वर्षी बर्लिनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. या चित्रपटात प्रियांका चोप्राची भूमिका कशी आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! करणच्या पहिल्या ऍक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार सिद्धार्थ, पाहा फर्स्ट लूक

-‘रस्ता दिसतोय तिथपर्यंत चालत राहा’, अनुपम खेर यांनी शेअर केलेली पोस्ट ठरतेय लक्षवेधी

-लग्नाच्या बातम्यांमध्ये तारा सुतारियाचे फोटोशूट, कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही बॉयफ्रेंड आदर जैन


Latest Post

error: Content is protected !!