Monday, February 10, 2025
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये १५ वर्ष गाळला होता घाम, मात्र ओटीटीच्या बोल्ड भुमिकेने चमकवले नशीब

‘या’ अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये १५ वर्ष गाळला होता घाम, मात्र ओटीटीच्या बोल्ड भुमिकेने चमकवले नशीब

बॉलिवूडमधील अनेक प्रतिभावान कलाकार वर्षानुवर्षे प्रसिद्ध होण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशातच त्यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. असेही अनेक अभिनेते आहेत ज्यांनी सुरुवातीला खूप संघर्ष केला. पण जेव्हा त्यांचे नशीब चमकले,, तेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्री रसिका दुग्गलच्या (Rasika Dugal) बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. ती १५ वर्षे इंडस्ट्रीत काम करत असली, तरी यादरम्यान तिच्या काही भूमिकांचे कौतुकही झाले, पण तिला नाव-ओळख मिळाली नाही. त्यानंतर ओटीटीच्या भुमिकेने तिचे नशीब चमकवले.

‘मिर्झापूर’ने उलगडले नशीब
रसिकाने ‘नो स्मोकिंग’, ‘हायजॅक’, ‘औरंगजेब’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘किस्सा’, ‘वन्स अगेन’, ‘लव्ह स्टोरीज’, ‘हमीद’, ‘मंटो’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण ओटीटीच्या ऑफरने तिचे नशीब चमकले. २०१८ मध्ये रसिकाने पंकज त्रिपाठीच्या ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजमध्ये त्यांची पत्नी बीना त्रिपाठीची भूमिका साकारली होती. या बोल्ड कॅरेक्टरने प्रचंड दहशत निर्माण केली आणि ती एका रात्रीत प्रसिद्ध झाली. तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले.

रसिकाने वयाच्या २२ व्या वर्षी बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले. ‘अनवर’ हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केले. पण ‘मिर्झापूर’ने तिची लोकप्रियता शिखरावर नेली. ‘मिर्झापूर’ वेबसीरिजचे २ सीझन आले आहेत. दोन्ही सीझनमध्ये तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

यानंतर तिच्याकडे काही मोठे प्रोजेक्ट आले. ‘मेड इन हेवन’, ‘दिल्ली क्राइम , ‘आऊट ऑफ लव्ह’, ‘अ सुटेबल बॉय’ आणि ‘ओके कॉम्प्युटर’ या वेबसीरिजमध्येही ती दिसली. यातील ‘दिल्ली क्राईम’मधील तिच्या अभिनयाला खूप प्रेम मिळाले.

रसिका दुग्गलचा जन्म १७ जानेवारी १९८५ रोजी जमशेदपूरमध्ये झाला. रसिकाप्रमाणेच तिचा पती मुकुल चड्ढाही चित्रपट जगताशी संबंधित आहे. मुकुल चड्ढा अनेक वेबसीरिजमध्ये दिसला आहे. रशिका आणि मुकुल यांचे २०१० मध्ये लग्न झाले होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा