Sunday, July 14, 2024

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला बघताच अक्षयची टरकायची? खुद्द रवीनाच म्हणालेली, ‘तो तिला सहन करू शकत नव्हता’

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार असतात, जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा अनुभवी कलाकारांना घाबरतात. अशा अभिनेत्यांमध्ये ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचाही समावेश होतो. याचा खुलासा खुद्द अभिनेत्री रवीना टंडन हिने केला होता. काय होता तो किस्सा आणि कोण होती ती अभिनेत्री चला जाणून घेऊया…

सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. 90च्या दशकात अशाही बातम्या आल्या होत्या की, ते दोघे एकमेकांना डेट करत होते. रवीनाने खुलासा केला होता की, दोघांनीही1995मध्ये डेटिंग करण्यास सुरुवात केली होती, पण त्यांना हे सर्वांना सांगायचे नव्हते. मजेशीर बाब अशी की, सन 1996मध्ये रेखा आणि अक्षयच्याही रोमान्सच्या बातम्या आल्या होत्या.

रवीनाने नंतर एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्यांच्यात काहीही सुरू नव्हते. तसेच, अक्षय हा रेखा (Rekha) यांच्यापासून दूर पळायचा. सन1994मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या सिनेमात अक्षय, रवीना आणि रेखा झळकले होते. रवीनाने मुलाखतीत सांगितले होते की, दोघेही 90च्या दशकाच्या शेवटी एकमेकांच्या जवळ आले होते.

रवीना टंडनने जेव्हा अक्षय आणि रेखाच्या डेटिंगला म्हटले होते खोटे
‘खिलाडियों का खिलाडी’ या शूटिंगदरम्यान जेव्हा अक्षय आणि रेखा यांच्या डेटिंगच्या अफवा प्रत्येक ठिकाणी झळकत होत्या. त्यावेळी रवीना टंडनने पुढे येऊन या अफवा खोट्या असल्याचे सांगितले होते. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, “मला वाटत नाही की, अक्षयला रेखाशी काही घेणं-देणं होतं. खरं तर, तो त्यांच्यापासून दूर पळायचा.”

रवीनाशी वेगळे झाल्यानंतर ट्विंकल खन्नाला डेट करत होता अक्षय
तिने पुढे सांगितले होते की, “सिनेमामुळे अक्षयने रेखाला सहन केले. एक काळ असे होते, जेव्हा रेखाला घरून त्याच्यासाठी जेवणाचा डब्बा तयार करून घेऊन यायचा होता. मात्र, तेव्हा मी सावध झाले होते. मला वाटले की, आता हे जरा जास्तच होत आहे.” माध्यमांतील वृत्तानुसार, सन 1998मध्ये रवीनाशी नातं तोडल्यानंतर अक्षयने ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिला डेट करू लागला होता.

आयुष्यात सुखी आहेत अक्षय आणि ट्विंकल
अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर सन 2001मध्ये संसार थाटला. हे जोडपे दोन मुलांचे आई-बाबा आहेत. त्यांच्या मुलाचे नाव आरव आहे आणि मुलीचे नाव नितारा आहे. निताराचा जन्म 2012मध्ये झाला होता. दुसरीकडे, रवीना व्यावसायिक अनिल थडानी याच्याशी संसार थाटला होता. तिलाही दोन मुले आहेत. तिच्या मुलीचे नाव राशा थडानी आणि मुलाचे नाव रणबीरवर्धन थडानी असे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘टिप टिप बरसा’ गाण्यात अक्षय कुमारसह काम करायला तयार नव्हती रवीना, दिग्दर्शकानेच लढवली ‘ही’ युक्ती
का राहिली अक्षय कुमार आणि रवीना यांची प्रेम कहाणी अपूर्ण?

हे देखील वाचा