सोशल मीडीयावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच धूमाकुळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या प्रियकराला प्रपोज करताना दिसत आहे. केदारनाथ मंदिरासमोरचा हा व्हिडिओ आहे. जो सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या मुलीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. ती मुलगी गुडग्यावर बसुन तिच्या प्रियकराला प्रपोज करताना दिसत आहे. तिचा प्रपोज प्रियकर स्वीकारतो आणि त्यानंतर तो मुलीला मिठी मारतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. धार्मिक स्थळावर असे व्हिडीओ शूट करणे याला काहीजण चुकीचे म्हणत आहेत, तर काहीजण याला सुंदर म्हणत आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मंदिरातील परिसराच्या वतीने या जोडप्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावर पोलिस कारवाई करत आहेत. पोलिसांच्या या कृतीवर आणि घटनेवर आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) प्रतिक्रिया दिली आहे. रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने या जोडप्याचे समर्थन करताना पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
— Raveena Tandon (@TandonRaveena) July 6, 2023
रवीनाने ट्विट करताना लिहिले की,”आपले देव प्रेम आणि भक्तांना आशीर्वाद देण्याच्या विरोधात कधीपासून झाले? त्या देव भक्तांना फक्त त्या क्षणांना पवित्र बनवायचं इतकेच आहे. कदाचित प्रपोज करायची पाश्चिमात्य पद्धत आणि संस्कृतीच आजही सुरक्षित आहे. गुलाब, मेणबत्त्या, अंगठी आणि चॉकलेट्स. खरंच हे दु:खदायक आहे. ज्या दोन जिवांना एकत्र यायच होत, त्यांना फक्त देवाकडून आशीर्वाद घ्यायचा होते. त्यांच्याच विरोधात कारवाई केली जात आहे.” तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी खूप साऱ्या कमेंट करत आहेत. (Actress Raveena Tandon supports the couple who proposed in front of Kedarnath temple)
अधिक वाचा-
–मलायका अरोराचे वडील रुग्णालयात दाखल, अभिनेत्रीचा आईसोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
–‘नवलाई माझी लाडाची लाडाची गं’ गाण्यावर थिरकल्या निवेदिता सराफ; चाहते म्हणाले, “आमची अप्सरा…”