Friday, March 29, 2024

‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ने अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’लाही टाकले मागे, भारतात पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

मार्वल स्टुडिओजच्या स्पायडर-मॅनच्या प्रसिद्ध सीरिजचा तिसरा भाग ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट उर्वरित देशांच्या एक दिवस आधी म्हणजेच १६ डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ४१.५० कोटींचे ओपनिंग कलेक्शन केले आहे. याने अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’चा रेकॉर्ड मोडला आहे. ‘सूर्यवंशी’चे ओपनिंग कलेक्शन २६.२९ कोटी होते.

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कमावले १८ कोटी रुपये
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ भारतात ५०% व्यापासह ३२६४ स्क्रीनवर प्रदर्शित झाला. तर ‘सूर्यवंशी’ ३५०० स्क्रीन्सवर कुठे-कुठे ५०-७०% आणि १००% सह प्रदर्शित झाला. ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ हा २०२१ मध्ये भारतात सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा हॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. (spider man no way home box office collection day latest news and udpate)

या चित्रपटाने भारतात प्रदर्शित होण्यापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमधून १८ कोटींची कमाई केली होती. चित्रपटाची क्रेझ पाहता याचा अंदाज १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या साऊथच्या ‘पुष्पा’ चित्रपटाच्या कमाईवरही पडू शकतो. ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत.

टॉम हॉलंडने साकारली स्पायडर मॅनची भूमिका
‘स्पायडर मॅन: नो वे होम’ जॉन वॉटसनने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात ‘स्पायडर-मॅन: होमकमिंग’च्या टॉम हॉलंडने स्पायडर-मॅनची भूमिका साकारली आहे. चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या मालिकेतील ‘स्पायडर मॅन होमकमिंग’ या चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी ९.३६ कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले होते.

२०२१ मधील सर्वात मोठे हॉलिवूड चित्रपट
कोव्हिड काळात प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शन खूपच कमी आहे. १४ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या ‘वेनम – लेट देअर बी कार्नेज’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.७१ कोटींची कमाई केली होती. २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘शांग-ची ऍ्ड द लीजेंड ऑफ द टेन रिंग्ज’ या चित्रपटाचे ओपनिंग कलेक्शन १.९० कोटी रुपये होते. त्याचवेळी मार्व्हल स्टुडिओजच्या ‘इटर्नल्स’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.७५ कोटींची कमाई केली. या अर्थाने, ‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ २०२१ मध्ये प्रदर्शित होणारा भारतातील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट बनला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा