‘दे दना दन’ फेम अभिनेत्री समीरा रेड्डीने मिळवला कोव्हिडवर विजय! मुलांसोबत मस्ती करत अभिनेत्रीने दिला तंदुरुस्तीचा मंत्र

sameera reddy has fun with children posted fitness video for fans


अभिनेत्री समीरा रेड्डीने शुक्रवारी (७ मे) सोशल मीडियाच्या माध्यमातून, लोकांना कोव्हिडमधून बरे होण्याचे आणि तंदुरुस्त राहण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते ठीक होण्याच्या मार्गावर आहेत.

लहान मुलांसोबत मस्ती करताना दिसली समीरा
समीरा रेड्डीने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती आणि तिची मुले हंस व नायरा व्यायाम करत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये तिघेही नाचताना आणि मस्ती करताना दिसत आहेत. मुले तिला कसे व्यस्त ठेवतात हेही अभिनेत्रीने सांगितले आहे.

चाहत्यांना दिला तंदुरुस्तीचा मंत्र
समीरा रेड्डीने ही पोस्ट शेअर करत, त्याच्यासोबत लिहिले की, “तुम्ही तंदुरुस्त आहात का? पुढे जात राहा! लक्ष केंद्रित ठेवा!” कोव्हिड रिकव्हरीनंतर तिने या दिवसाला ‘हॅशटॅग फिटनेस फ्रायडे’ म्हणूनही संबोधले आहे. व्यायामाबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “ते हळू आणि स्थिर आहे, परंतु मजेदार आणि सकारात्मक वृत्तीने आहे.”

व्हायरल झाली होती पोस्ट
अलीकडेच, समीराने तिच्या गरोदरपणातील एक जुना फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने, एका साथीच्या रोगाच्या काळात मुलांना वाढवणे किती कठीण आहे, याबद्दल लिहिले होते.

साल २०१४ मध्ये समीरा रेड्डीने तिचा दीर्घकालीन प्रियकर, व्यावसायिक अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. लग्नाआधी दोघे जवळपास अडीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर एका वर्षाने म्हणजेच, २०१५ मध्ये तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. तर, २०१९ मध्ये समीरा दुसऱ्यांदा आई बनली. ती अनेकदा आपल्या लाडक्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

समीराने ‘दे दना दन’, ‘मैंने दिल तुझको दिया’, ‘नक्षा’, ‘नो एंट्री’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल

-‘अंदाज अपना अपना’ चित्रपटादरम्यान ‘या’ कारणामुळे आमिर खानला आवडत नव्हता सलमान खान; नंतर बनले जिगरी मित्र


Leave A Reply

Your email address will not be published.