‘यावर्षीचा ख्रिसमस नाही पाहू शकणार’, गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या अभिनेत्रीचे वक्तव्य

actress sarah harding suffering from breast cancer reveals she may not celebrate this christmas


हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सारा हार्डिंग स्तन कर्करोगाचा बळी ठरली आहे. साराने ही दुःखद बातमी तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. ट्विटरवर आपल्या आजाराची माहिती देताना साराने एक मोठी पोस्ट लिहिली. त्यानंतर, चाहते ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. यासह, सारा हार्डिंगने एका मुलाखतीत सांगितले की, डॉक्टर तिला म्हणाले, यावर्षीचा ख्रिसमस ती पाहू शकणार नाही. सारा एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे, याचा खुलासा तिने मागच्या वर्षीच केला होता.

यासह एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सारा हार्डिंगने डिसेंबर 2020 मध्ये सांगितले होते की, “माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले आहे, यावर्षीचा ख्रिसमस माझ्या आयुष्यातील शेवटचा ख्रिसमस असू शकतो.”

सारा एका मुलाखतीत म्हटली की, आता तिला या वेदनेपासून मुक्त व्हायचे आहे आणि आरामात राहायचे आहे. यासह ती म्हणाली, “मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा आहे, माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे, याचा मला फरक नाही पडत. मी कधी कधी एक-दोन ग्लास वाईन देखील पिते, कारण असे केल्याने मला आराम मिळतो. मी जीवनाच्या अशा वळणावर आहे, जिथे मला माहिती नाही माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे.”

सारा हार्डिंगच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर 2002 मध्ये जेव्हा तिने पॉपस्टार्स नावाच्या टॅलेंट शोमध्ये भाग घेतला होता, तेव्हाच ती लाईमलाईटमध्ये आली होती. यानंतर साराने बरीच हिट गाणी दिली. ती ज्या बँडचा भाग होती, ते 2012 मध्ये एकत्र आले. पण 2013 मध्ये एकाच वर्षात या बँडला बंद करावे लागले. यानंतर, सारा हार्डिंगने बरेच टीव्ही शोज देखील केले. याव्यतिरिक्त 2017 मध्ये ती सेलिब्रिटी बिग ब्रदरची विजेती ठरली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायिका रेणुकाचे ‘५२ गज का दामन’ गाण्याच्या यशानंतर नवीन गाणे रिलीझ, अवघ्या ५ दिवसात १३ लाख हिट्स

-मोनालिसाही झाली ‘डोन्ट रश चॅलेंज’मध्ये सामील, डान्स मुव्हने लावले चाहत्यांना वेड

-आलिया भट्टचा ‘हा’ डायलॉग म्हणत चक्क रडली होती सारा अली खान, पाहा थ्रोबॅक व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.