भारीच ना! सायली संजीवचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, प्रेम कहाणीच्या चर्चेला पुन्हा आले उधाण

‘काहे दिया परदेस’ या मालिकेमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सायली संजीव कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे पोस्ट शेअर करते. अशात धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड बरोबर देखील तिचे नाव जोडले जात आहे. आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात तिच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटमुळे तिची प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरली. तसेच नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

सायली संजीव ही एक मराठमोळी अभिनेत्री असून कायमच तिचा सिंपल आणि स्वीट लूक चाहत्यांना घायाळ करतो. अशात तिने आता पोस्ट केलेल्या रील व्हिडिओमध्ये तिने मेसी वेणी घातली असून, कपाळी काळ्या रंगाची टिकली लावली आहे. यामध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तिने रीलचे २ व्हिडिओ पोस्ट केले असून, यातील एकामध्ये ‘बडे अच्छे लगते है’ या गाण्यातील काही ओळीवर तिने व्हिडिओ बनवला आहे. तर ‘बावरा मन’ या गाण्यावर तिने दुसरा रील व्हिडिओ बनवला आहे.

https://www.instagram.com/reel/CViwgLRD01M/?utm_source=ig_web_copy_link

या दोन्ही व्हिडिओमध्ये असलेली गाणी ती अगदी मनापासून आणि भावनेने गात असल्याचे दिसत आहे. तिच्या या दोन्ही व्हिडिओवर चाहत्यांनी तूफान लाइक्सचा वर्षाव केला आहे. तसेच अनेकजण तिला हार्ट ईमोजी कमेंटमध्ये पाठवत आहेत. काही दिवसांपूर्वी तिने मेहेंदी काढतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी देखील तिचे लग्न ठरले की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

सायलीच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती ‘झिम्मा’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एबी आणि सीडी’ चित्रपटामधील तिच्या अभिनयाने तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमधून तिने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. यामध्ये तिने साकारलेले गौरी हे पात्र तिला घराघरात घेऊन गेले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘माझ्यासोबत एका दिग्दर्शकाने सेटवरच केली होती शिवीगाळ’, ईशा गुप्ताचा खुलासा

अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ फोटो पाहिल्यावर तुम्ही देखील नक्कीच म्हणाल, ‘वय हा फक्त आकडा आहे’

‘कोणाचीही मुलगी, बहीण किंवा आई असूदे, मी तिच्याशीच लग्न करणार’, वाचा परेश रावल यांची लव्हस्टोरी