Wednesday, March 29, 2023

चाळिशी पार करणाऱ्या अभिनेत्रीने भर थंडीत बिकिनीत घालून वाढवले तापमान, युजर्सही म्हणाले, ‘यार ये कितनी…’

सिनेइंडस्ट्रीत एकापेक्षा एक बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींचा भरणा आहे. त्यात टीव्ही आणि सिनेमात काम करणाऱ्या शमा सिकंदर हीच्या नावाचा देखील समावेश होतो. शमा नेहमीच तिच्या सिझलिंग अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. अशात तिने पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवत तिचा सेक्सी लूक दाखवला आहे. शमाने शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ माजवली आहे. यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या बिकिनीत दिसत आहे. यामध्ये तिने तिचा हॉट लूक बेधडकपणे कॅमेऱ्यापुढे फ्लॉन्ट करत पोझ दिले आहेत.

बिकिनी लूकमध्ये हॉट दिसतेय शमा सिकंदर
शमा सिकंदर (Shama Sikander) हिने बिकिनी लूक (Shama Sikander Bikini Look) पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे. यासोबतच तिने तिच्या केसांना मोकळे सोडले आहे. शमा या लूकमध्ये एकदम बिनधास्त दिसत आहे. तसेच, तिच्या फिटनेसनेही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. शमाच्या अदा पाहून चाहत्यांना विश्वासच बसत नाहीये की, ती 41 वर्षांची आहे. आजही शमा खूपच फिट आहे आणि तिच्या हॉट तसेच बेधडक अंदाजाने भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देऊ शकते.

बर्फाळ प्रदेशातील आनंद लुटतेय शमा
शमाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हॉट फोटो शेअर करत “बर्फिली,” असे लिहिले आहे. खरं तर, सध्या अभिनेत्री काश्मीरच्या गुलमर्ग येथे पतीसोबत खास क्षण घालवत आहे. ती दरदिवशी गोठवणाऱ्या थंडीतही बोल्डनेसचा तडका लावताना दिसत आहे. शमाच्या या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

तिच्या या फोटोवर तासाभरातच 30 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, चाहतेही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अनेकजण लव्ह इमोजी शेअर करत आहेत. एकाने कमेंट करत असे लिहिले आहे की, “तुमचे ट्रान्सफॉर्मेशन कमाल आहे.” दुसऱ्या एकाने कमेंट केली आहे की, “स्टनिंग दिसतेय.” आणखी एकाने लिहिले की, “यार ही किती ऑसम आहे.” एकाने तर असेही लिहिले की, “तुझी स्माईल खूप गोड आहे.”

अनेक प्रोजेक्ट्समध्ये झळकलीय शमा
शमा सिकंदर सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. मात्र, तिने अभिनयातही आपला ठसाही उमटवला आहे. तिने अनेक सिनेमे, टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. त्यात ‘मन’, ‘बालवीर’, ‘धूम धडाका’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. असे असले, तरीही मागील काही काळापासून ती कमी प्रोजेक्ट्ससोबत करार करत आहे. (actress shama sikander wear bikini in kashmir snow shares sexy photos)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अंगावर फक्त बेडशीट अन् हातात कॉफी, ‘बिग बॉस 16’ फेम प्रियांकाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल
आलियाने शेअर केला गोंडस बाळाचा फोटो, गोंधळलेल्या नेटकऱ्यांना पडले 1500 प्रश्न; एक नजर टाकाच

हे देखील वाचा