Monday, June 24, 2024

नव्या व्हिडिओमधून समोर आले श्वेता तिवारीचे वय, फिटनेस पाहून फॅन्स म्हणाले…

कलाकार आणि फिटनेस या दोन एकमेकांना पूरक गोष्टी आहेत. कलाकार म्हटले की त्यांना त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष द्यावे लागते. स्क्रीनवर उत्तम दिसण्यासाठी त्यांना फिटनेस खूपच महत्वाचा आहे. आजच्या काळात कलाकारांमध्ये फिटनेसचे मोठे वेड दिसून येते. अभिनेत्रीचा फिटनेस तर कमालीचा आहे. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींना टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्री जोरदार टक्कर देताना दिसतात. टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या श्वेता तिवारीच्या फिटनेस देखील कमालीचा आहे.

श्वेता इंडस्ट्रीमधील फिट अभिनेत्रींच्या यादीत सर्वात वर येते. फिटनेस, प्रतिभा आणि सौंदर्य यांच्या बळावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्वेताकडे पाहिले तर तिचे खरे वय आपल्या लक्षात देखील येणार नाही. श्वेता नेहमीच तिच्या फिटनेसने आणि सौंदर्याने सगळ्यांकडून कौतुक करून घेते. अशातच श्वेताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल देखील होत आहे.

या व्हिडिओमध्ये श्वेताने इंस्टाग्रामवरील रिल्सचा वापर करून हा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या चेहऱ्यावरून आणि स्किनवरून तुमच्या वयाचा अंदाज लावला जातो. या रिलवर श्वेताचे वय चक्क २३ वर्ष दाखवले आहे. श्वेताने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले, “बेबी तू चुकीचा अंदाज लावला आहे.” श्वेताचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, फॅन्स त्यावर भरभरून कमेंट्स करत आहे.

श्वेताच्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी आणि इंडस्ट्रीमधील तिच्या मित्रांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला संतूर मॉम म्हटले आहे, काहींनी हॉट म्हटले आहे, तर काहींनी हार्ट आणि फायरचे ईमोजी पोस्ट केले आहेत. यासोबतच फॅन्स देखील तुफान कमेंट्स करत तिच्या फिटनेसचे कौतुक करताना दिसत आहेत.

तत्पूर्वी श्वेता ४१ वर्षांची असून, तिची २१ वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. तिची मुलगी पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दोघींना एकत्र पाहिले की, वाटत नाही त्या मायलेकी आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-अरे देवा! पुन्हा पोस्टपॉन झालं आलिया अन् रणबीरचं लग्न, काय आहे नेमकं कारण?

हे देखील वाचा