‘पैठणी म्हणजे आनंद…’ पैठणीचे कौतुक करत सोनाली कुलकर्णीने शेअर केले तिचे सुंदर फोटो

अनेक चित्रपट,‌‌ आणि डान्स करून नावारूपाला आलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी चाहते आहेत. आजकाल तर तिचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. आयुष्यातील प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या निरनिराळ्या स्टाईलचे दर्शन आपल्याला इथून मागे झालेच आहे. अशातच पारंपारिक लूकमधील तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही पैठणीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गडद निळ्या रंगाची एक सुंदर पैठणी नेसली आहे. या साडीला असलेल्या केशरी रंगाच्या मोठ्या काठामुळे ती साडी आणखीनच आकर्षक दिसत. या साडीवर तिने गळ्यात मोत्याचे गळ्यातले घातले, तसेच हातात मोत्याच्या बांगड्या आणि मोत्याची नथ घातली आहे. या सगळ्यासोबत तिने कपाळी लावलेली छोटीशी टिकली तिच्या या सौंदर्याचे केंद्रबिंदू ठरत आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (Actress sonalee Kulkarni share her saree look photos on social media)

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “पैठणी म्हणजे आनंद, पैठणी म्हणजे संस्कार, पैठणी म्हणजे स्वप्न, पैठणी म्हणजे वारसा.” तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा पैठणी लूक खूप आवडला आहे. एका चाहत्याने या फोटोवर “सुरेख पैठणी आणि सुरेख तू” अशी कमेंट केली आहे, तर आणखी एका चाहत्याने “खूप सुंदर” अशी कमेंट केली आहे. बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तु एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोश्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

साध्याभोळ्या अंतराने वेस्टर्न ड्रेस परिधान करत लावले जोरदार ठुमके, चाहता म्हणाला, ‘विषय संपला’

अरे भारीच की! ‘बाहुबली’ चित्रपट येणार मराठी भाषेत, ‘हे’ दोन कलाकार देणार चित्रपटाला आवाज

यहुदी संस्कृतीची माहिती देणारा, भयपटांच्या अजून एक पाऊल पुढे जाणारा ‘डिबुक’ लवकरच होणार प्रदर्शित

Latest Post