Friday, April 19, 2024

Sonu Walia | काम न मिळाल्यामुळं मिस वर्ल्डने केलं ‘बी ग्रेड’ चित्रपटात काम, परवीन बाबीसोबत केली जायची तुलना

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात काम करूनही त्यांना आपल्या नावाची विशेष छाप पाडता आली नाही. यापैकी एक अभिनेत्री म्हणजे सोनू वालिया (Sonu Walia). आज (१९ फेब्रुवारी) सोनू वालियाचा वाढदिवस आहे. या खास निमित्ताने जाणून घेऊ या तिच्याबद्दल.

सोनू वालिया ही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचा जन्म १९ फेब्रुवारी १९६४ला दिल्लीमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. सोनुने सायकॉलॉजीमध्ये शिकण घेतले आहे. याशिवाय ती पत्रकारितासुद्धा शिकली आहे. सोनूचे वडील भारतीय सैन्यात होते. तिला लहानपणापासून मॉडेलिंग आणि अभिनय करण्याची आवड होती. तिची उंची आणि सौंदर्य पाहून कोणीही प्रेमात पडेल अशीच ती होती.

सोनूने १९८४ मध्ये ‘मिस वर्ल्ड’च्या स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा देखील जिंकली. इथूनच तिला हिंदी चित्रपटाच्या ऑफर यायला लागल्या. १९८८ मध्ये सोनुने ‘खून भरी मांग’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री रेखा (Rekha) होत्या. मात्र तरीही सोनूला या चित्रपटाने चांगलीच ओळख मिळवून दिली. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

त्यानंतर आलेल्या ‘आकर्षण’ चित्रपटात सोनुने खूपच बोल्ड सीन दिले. मात्र तरीही तिला आपल्या अभिनयाची विशेष छाप पाडता आली नाही. त्यामुळे तिने काही बी ग्रेड चित्रपटात देखील काम केले. अशा चित्रपटात काम केल्याने तिची प्रतिमा खूपच मलीन झाली, ज्यामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सोनुने ‘दिल आशना है’, ‘खेल’ , ‘स्वर्ग जैसा घर’, ‘आरक्षण’ , ‘तुफान’ अशा अनेक चित्रपटात काम केले. ती हुबेहुब परवीन बाबीसारखी (Parveen Babi) दिसायची म्हणून तिची तुलना परवीन बाबीसोबत केली जाऊ लागली. सोनूने अनेक टीव्ही कार्यक्रमात देखील अभिनय केला आहे.

सोनू आपल्या वैवाहिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिली. तिने १९९५ मध्ये उद्योजक सूर्य प्रकाशसोबत विवाह केला होता. मात्र काही काळात त्याचे निधन झाले. तिला पतीच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का बसला होता. यानंतर ती आपल्या आई वडिलांकडे ऑस्ट्रेलियाला निघून गेली. काही काळाने तिने चित्रपट निर्माता प्रताप सिंगसोबत दुसरा विवाह केला.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा