Tuesday, April 23, 2024

आदिल खानने तुरुंगातून राखी सावंतला केला फोन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या जीवाला धोका…’

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. लाईमलाइटमध्ये कसे राहायचे हे राखीला चांगलेच ठाऊक आहे. यापूर्वी राखी तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत होती. राखीने आदिल खान दुर्राणीशी लग्न केले. लग्नानंतर दोघांच्या नात्यात खूप दुरावा निर्माण झाला आणि अभिनेत्रीने पतीवर अनेक आरोप केले, ज्यानंतर आदिलला तुरुंगात जावे लागले. राखीने आदिलवर मारहाणीसह अनेक मुलींशी संबंध असल्याची चर्चा केली होती. दरम्यान, आता राखीने सांगितले आहे की, ‘आदिलने तिला कॉल केला आहे आणि त्याला तिच्या आयुष्यात परत यायचे आहे.’

राखी सावंत (rakhi sawant ) हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ती पॅपराझींना सांगते की, “आदिलचा आता जेलमधून फाेन आला हाेता. मी म्हणाली, तुरुंगातून ताबडतोब बाहेर ये आणि मला घटस्फोट दे. त्यावर ताे म्हणाला, ‘मला माफ कर, मी घटस्फोट देणार नाही.’ मी म्हणाली आता नाही, तू माझे आयुष्य उध्वस्त केले आहेस. माझा तुझ्यावर पुन्हा विश्वास बसत नाही. मला भीती वाटते. यावेळी मी माफ केले, तर माझ्या जीवाला धोका आहे.” राखीच्या या बोलण्यातून स्पष्ट होते की, ती आदिलला खूप घाबरते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अलीकडेच राखी सावंतचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हाेता. या व्हिडिओमध्ये राखी वधूच्या जोड्यामध्ये दिसत होती. तिने पिवळ्या आणि सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला होता. यासोबतच तिने बरेच वजनदार दागिनेही परिधान केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यादरम्यान, राखी पॅपराझींसमाेर ‘सबकी बारातें आयें…’ गाण्यावर डान्स करताना दिसली. राखी पॅपराझींना म्हणाली,  ‘या, माझ्या मिरवणुकीत या…’. माझ्या मिरवणुकीत एक एक करून लवकर या. ऐक, फक्त माझ्या मिरवणुकीत ये, मधुचंद्रात नाही. हे ऐकून तिथे उपस्थित सर्व पॅपराझी हसायला लागले.( adil khan durrani call tv actress rakhi sawant from jail actress said he is not ready for divorce video goes viral on social media )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ दिग्गज गायकाच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये पोलिसांची एन्ट्री, स्टेजवर जात गायकाला गाणे गाण्यापासून रोखले

रवीनाने ‘एक दो तीन’ गाण्यावर डान्स करत माधुरीला दिले चॅलेंज; ‘धक धक गर्ल’ म्हणाली…

हे देखील वाचा