काय बदल आहे राव! ३ महिन्यात आदित्य नारायण झालाय ‘फिट’, ट्रान्सफॉर्मेशन पाहून अभिनेता विक्रांत मेस्सीही हैराण


टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘इंडियन आयडल’चा होस्ट आदित्य नारायण हा कधी त्याच्या वक्तव्यामुळे, तर कधी त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत असतो. त्याचे चाहते देखील त्याच्या पोस्टला पसंती देतात. अशातच त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याने त्याचा ट्रान्सफॉर्मेशन लूक दाखवला आहे. आदित्यच्या या फोटोवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहे.

बॉलिवूडमधील दिग्गज गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस आहे.‌ तो बेडवर झोपलेला दिसत आहे. या फोटोमध्ये तो निस्तेज दिसत आहे. या फोटोमध्ये त्याचे टमी फॅट दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले की, “जर तुम्ही माझ्यावर प्रेम नाही करू शकत. (15 एप्रिल, 2021 जेव्हा माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती)”

दुसऱ्या फोटोमध्ये आदित्य त्याची टोन्ड बॉडी दाखवताना दिसत आहे.‌ फोटोमध्ये त्याचे सिक्स पॅक दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “तुम्ही माझ्या पात्रतेचे नाही. (15 जून, 2021)”

आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले होते. या गोष्टीची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर दिली होती.

मागील तीन महिन्यांपासून आदित्यने त्याच्या फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. याचा पुरावा म्हणजे त्याची आत्ताची सोशल मीडियावरील पोस्ट. त्याच्या या फोटोवर अभिनेता विक्रांत मेस्सीही हैराण झाला आहे. त्याने अत्यंत मजेशीर अंदाजात कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “वाव हॉट वाव, नानू हलवाई पासून ते नानू जलवाई पर्यंत.”

तसेच इतर काही कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या फोटोवर कमेंट केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अभिनेता बनण्यासाठी आलोय, पॉर्नस्टार नाही’, इंटिमेट सीनवर ‘बिग बॉस’ फेम पारस छाबडाचे वक्तव्य

-‘आई नक्कीच खुश होईल’, म्हणत जेमी लिव्हरने केले लेहंग्यातील ग्लॅमरस फोटो शेअर

-मराठमोळ्या पर्ण पेठेच्या दिलखेचक फोटोची चाहत्यांना भुरळ; एक नजर टाकाच


Leave A Reply

Your email address will not be published.