Wednesday, February 21, 2024

खळबळजनक! आलिया भट्टनंतर क्रिती सेनॉनचाही ‘तसला’ व्हिडीओ व्हायरल; एकदा पाहाच

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विकासामुळे अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणली आहे. मात्र, यामुळे अनेक धोके देखील निर्माण झाले आहेत. त्यापैकी एक धोका म्हणजे डीपफेक. डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीचा चेहरा लावता येतो. यामुळे बनावट व्हिडिओ तयार करता येतात. बॉलिवूड अभिनेत्रींना डिपफेक व्हिडीओंचा धोका वाढत चालला आहे. नुकताच रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओनंतर आता आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनचेही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये अभिनेत्रींना अश्लील स्थितीत दाखवण्यात आले आहे.

क्रिती सेनॉनच्या (Kriti Sanon) डीपफेक व्हिडीओमध्ये तिला एका हॉट आणि बोल्ड अशा अवतारात दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये ती तिचे काही भाग दाखवताना दिसत आहे. ही मॉडेल वेगळी असून तिच्या चेहेऱ्याच्या जागी क्रितीचा चेहेरा लावण्यात आला आहे. हा व्हिडीओ खोटा आहे हे कळून येत असलं तरी बऱ्याच लोकांचा काही क्षणापुरता गोंधळ होत आहे.

क्रितीचा हा व्हिडिओ ‘kritisanon.ilyy’ या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ चर्चेा विषय ठरत आहे. या व्हिडीओमुळे सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. सेलिब्रिटीजच्या चेहऱ्याचा असा होणारा गैरवापर पाहून बऱ्याच लोकांनी याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti Sanon 👑 (@kritisanon.ilyy)

रश्मिका मंदानाच्या व्हिडीओप्रकरणी नुकतंच दिल्ली पोलिसांनी बिहारमधून 19 वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. आता लवकरच आलिया भट्ट आणि क्रिती सेनॉनच्या या व्हिडीओ प्रकरणावरही त्वरित कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. क्रिती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (After Alia Bhatt Kriti Sanon Deepfake video goes viral)

आधिक वाचा-
शेवंताचा क्लासी लूक, पाहा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या दिलखेचक अदा
ना काजोल… ना राणी मुखर्जी, ‘या’ अभिनेत्रीने शाहरुख खानसोबत केले आहेत सर्वाधिक चित्रपट; एकदा वाचाच

हे देखील वाचा