‘हिच्या चालण्याला नक्की काय झाले?’, म्हणत पुन्हा एकदा मलायका झाली चालण्यावरून ट्रोल


सोशल मीडियावर कलाकार ट्रोल होणे ही खूपच सामान्य बाब आहे. रोज कोणी ना कोणी कलाकार नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करताना दिसतात. अभिनेत्री, मॉडेल, डान्सर असणारी मलायका अरोरा (malaika arora) तर अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असते. काही दिवसांपूर्वीच मलायकाला तिच्या चालण्यावरून ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा मलायका तिच्या चालण्यावरून ट्रोल होताना दिसत आहे. मलायका नेहमीच आपल्या फॅशनसाठी आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. तिची फॅशन तिच्या फॅन्सला प्रभावित करताना दिसते.

मलायकाला नेहमीच पॅपराजी जिममध्ये जाताना येताना स्पॉट करतात. नेहमीच प्रत्येक ड्रेस आत्मविश्वासाने कॅरी करणाऱ्या मलायकाला पाहणे तिच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. सेलिब्रिटी फोटोग्राफर असणाऱ्या विरल भियानीने तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका हिरव्या रंगाच्या शिमिरी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. मात्र या व्हिडिओमध्ये पुन्हा मलायकाच्या ड्रेसपेक्षा तिच्या चालीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटकऱ्यांनी तिच्या विचित्र चालीवर पुन्हा तिला ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले, “हिच्या चालण्याला नक्की काय झाले?”, दुसऱ्याने लिहिले, “चालती फिरती ग्लिटर दिसत आहे.”, अजून एकाने लिहिले, “तू नेहमीच अशी का चालते?”. तर अनेकांनी तिच्या लूकचे कौतुक देखील केले आहे. एकाने तिला ‘ब्युटीफुल’ लिहिले, तर काहींनी फायर ईमोजी पोस्ट केले आहेत.

मलायका तिच्या कमालीच्या फिटनेससाठी देखील खूपच लोकप्रिय आहे. चाळीशी पार करूनही मलायका अतिशय फिट आहे. तिचे योगा आणि जिम व्हिडिओ अनेक व्हायरल होतात. तिचा कमनीय बांधा नेहमीच सर्वांना आकर्षित करून फिट राहण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. सध्या मलायका ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोचे परीक्षण करताना दिसत असून, या शोच्या सेटवरचे तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

हेही वाचा-

सलमान खानने शेअर केलेल्या शर्टलेस फोटोवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केलेली कमेंट झाली व्हायरल

बर्थडे गर्ल करिश्मा शर्माचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाज पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

‘भाबीजी घर पर हैं’ मधील ‘या’ अभिनेत्याने केले बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम, ‘या’ मालिकेने बदलवले आयुष्य


Latest Post

error: Content is protected !!