अक्षयने खास अंदाजात दिल्या भूमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा; पोस्ट पाहून क्रिती सेनननेही केली भन्नाट कमेंट


बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही तिच्या दमदार अभिनयामुळे खूप लोकप्रिय आहे. भूमीने तिच्या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. ती रविवारी (१८जुलै) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आज तिला तिचे सगळे चाहते आणि कलाकार वेगवेगळ्या अंदाजात शुभेच्छा देत आहेत. यातच बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारने देखील तिला एका वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारने भूमी पेडणेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय कुमार आणि भूमी दिसत आहेत. या ब्लॅक एँड व्हाइट फोटोमध्ये भूमी खूपच दुःखी दिसत आहे. अक्षय एक वेगळ्याच प्रकारे तोंड करताना दिसत आहे. (Akshay kumar gives best wishes to bhumi Pednekar in different style)

या फोटोमध्ये अक्षय आणि भूमीचा एक वेगळाच अंदाज दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “बर्थ डे गर्लला हसविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. हिला आज जाणीव झाली आहे की, ती एक वर्षाने मोठी झाली आहे. चिंता नको करुस भूमी. आशा करतो की, तू देखील समजदार होत आहे, हॅपी बर्थ डे.”

अक्षय कुमारने दिलेल्या या कॅप्शनची सर्वत्र चर्चा चालू आहे. या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री क्रिती सेननने या पोस्टवर हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. अक्षयने शेअर केलेला हा फोटो प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांनी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता परत अक्षय आणि भूमी ‘रक्षाबंधन’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्या दोघांचे चाहते त्यांच्या या आगामी चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तुझी-माझी जोडी जमली रे! घटस्फोटानंतर मिनिषा लांबा पुन्हा एकदा पडली प्रेमात; स्वत:च केले कबूल

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ


Leave A Reply

Your email address will not be published.