अक्षय कुमारला ‘खिलाडी’ किताब देणाऱ्या चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण; दिग्दर्शकांकडून जुन्या आठवणींना उजाळा

Akshay Kumar Khiladi movie complete 29 years director of movie share


बॉलिवूडमधील ‘खिलाडी’ अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे अक्षय कुमार. अक्षय हा आज बॉलिवूडमधील एक टॉप अभिनेता आहे. त्याचा खिलाडी हा चित्रपट प्रदर्शित होऊन 29 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त बॉलिवूडमधील निर्माते अब्बास आणि मस्तान यांनी एक पोस्टर शेअर केला आहे. त्यांनी एका सस्पेन्स थ्रिलर पोस्टरसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तरुणपणातील अक्षय अब्बास आणि मस्तान सोबत दिसत आहेत. हा फोटो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका पार्टीमधील आहे.

या दिग्दर्शक जोडीने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “आज (शनिवार) खिलाडी या चित्रपटाला 29 वर्षे पूर्ण झाले आहेत. आमच्या करिअरमधील हा सर्वात हिट चित्रपट आहे. असं वाटत आहे जसं‌ काही काल गेलेले क्षण आजही आमच्या मनात जिवंत आहेत. या खास क्षणाला आमच्या टीममधील सगळेजण खूप मिस करत आहेत.”

अब्बास आणि मस्तान यांनी थॉमस झेविअर आणि निर्माते विनससोबत अक्षय कुमार, आयशा झुल्का, जॉनी लिव्हर, दीपक तिजोरी आणि सबिहासोबत संगीतकार जतीन ललित यांना हा फोटो टॅग केला आहे. ज्यांनी या चित्रपटाला सुपरहिट संगीत दिले होते.

अक्षय कुमारचा ‘खिलाडी’ हा चित्रपट 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा त्याच्या करिअरमधील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने एक ऍक्शन हिरो बनून लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटानंतर त्याला बॉलिवूडमधील ‘खिलाडी’ या नावाने ओळख मिळाली.

अब्बास आणि मस्तानसाठी त्यांचा हा दुसरा प्रदर्शित झालेला चित्रपट होता. या चित्रपटनंतर त्यांनी ‘बाझीगर’, ‘शोल्जर’, ‘हमराज’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’,’ऐतराज’, ‘रेस’ आणि ‘रेस 2’ हे चित्रपट केले आहेत.

अक्षय कुमार तसेच अब्बास आणि मस्तान यांनी ‘खिलाडी’ या चित्रपटानंतर ‘अजनबी’ आणि ‘ऐतराज’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.