Wednesday, April 22, 2026
Home बॉलीवूड अर्रर्र! अक्षय, जॉनचे सिनेमे बनवणाऱ्या निर्मातीविरुद्ध गुन्हा दाखल, केलीय कोटींची फसवणूक

अर्रर्र! अक्षय, जॉनचे सिनेमे बनवणाऱ्या निर्मातीविरुद्ध गुन्हा दाखल, केलीय कोटींची फसवणूक

हिंदी सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने बुधवारी (दि. २० जुलै) बॉलिवूड सिने निर्माती प्रेरणा अरोरा हिच्याविरुद्ध ३१.६ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बुधवारी तिला समन पाठवण्यात आले होते. मात्र, ती ईडीसमोर हजर झाली नाही. प्रेरणा सध्या तिच्या अधिकृत कामानिमित्त बाहेर गेली आहे. तिने तिचे वकील विवेक वासवानीच्या माध्यमातून वेळ मागितला होता. प्रेरणा हिने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यात अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांसारख्या कलाकारांच्या सिनेमांचा समावेश आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, प्रेरणा अरोरा (Prerna Arora) हिची बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीपर्यंत टीका होते. काम करताना तिला पारदर्शकता आणि थकबाकी यावरून अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. मागील वर्ी वासू भगनानी यांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांनी आरोप केला होता की, प्रेरणामुळे त्यांना ३१.६ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. कारण, तिने ‘पॅडमॅन’ आणि ‘केदारनाथ’ सिनेमाचे हक्क परत घेतले होते.

भोगलाय तुरुंगवास
प्रेरणाला फसवणुकीच्या आरोपाखाली ८ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला आहे. तिला डिसेंबर, २०१८मध्ये अटक झाली होती. तसेच, तिला डिसेंबर, २०१९मध्ये जामीनावर मुक्त करण्यात आले होते. एका चर्चेदरम्यान तिने आपली चूक मान्य केले होती. ती म्हणाली होती की, ती नव्याने सुरुवात करेल. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, “मला माहिती नाही की, मी काय आहे. मी खूप मोठी चूक केली, खूप जास्त केली. जर माझ्याकडेही कोणी मार्गदर्शक असता, तर या गोष्टी अशाप्रकारे खराब झाल्या नसत्या. मात्र, मी आता परत आले आहे आणि पुन्हा सिनेमांची निर्मिती करण्यास सुरुवात करेल. मला सेटल होण्यास थोडा वेळ नक्कीच लागेल, परंतु मी कधीच जाणार नाही.”

पैसे परत न केल्याचा होता आरोप
खरं तर, प्रेरणावर अनेक गुंतवणुकदारांनी फसवणूक आणि पैसे परत न केल्याचा आरोप लावला होता. प्रेरणाचे प्रकरण तेव्हा चर्चेत आले होते, जेव्हा निर्माते वासू भगनानी आणि त्यांच्या प्रॉडक्शन कंपनीने प्रेरणाविरुद्ध नोटीस पाठवली होती. वासू यांनी आपल्या तक्रारीत प्रेरणा, तिची आई आणि क्रिअर्ज एंटरटेन्मेंटच्या पार्टनरविरुद्ध गुन्हा दाखल केला. भगनानी यांनी प्रेरणाकडून लगेच ३१.६ कोटींची मागणी केली.

चार्जशीटमध्ये झाला होता खुलासा
चार्जशीटमध्ये खुलासा झाला होता की, प्रेरणाने अनेक गुंतवणुकदारांकडून पैसे घेतले होते. इतकेच नाही, तर त्या पैशांमधून प्रेरणाने सुनील शेट्टीच्या रियल इस्टेट कंपनीमार्फत ८ कोटींचा बंगला विकत घेतला होता. याव्यतिरिक्त प्रेरणाने अनेक सुविधांवरही पैसे खर्च केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

चाहत्यांसाठी खुशखबर! राणादा आणि पाठक बाईंची जोडी झळकणार ‘या’ बिगबजेट चित्रपटात

‘जो दिखता है, वो बिकता है’ उर्फी जावेदने ट्रान्सपरेंट कटआऊट ड्रेस परिधान करताच भडकले चाहते

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार गुड न्यूज? माध्यमांमध्ये चर्चा रंगल्यानंतर स्वतःच केला खुलासा

हे देखील वाचा