‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतून अक्षया देवधर घराघरात पोहचली. या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे, अक्षया यात बरीच साधी आणि सोज्वळ दाखवण्यात आली होती. मात्र ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. याची झलक तुम्हाला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पाहायला मिळेलच. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय राहून तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच तिचा एक दमदार व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा अक्षया(Akshaya Deodhar) हिचा दमदार अंदाज पाहायला मिळाला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षयाने साऊथ इंडियन ड्रेस परिधान केला आहे. उत्तम मेकअप आणि परफेक्ट हेअरस्टाईलने अभिनेत्रीच्या रुपात भर टाकली आहे. यात तिची सुंदरता अगदी पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये अक्षया देवधर तिच्या मैत्रिनींसाेबत ‘रा रा रेड आय एम रेडी’ या गाण्यावर दमदार डान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ अक्षयाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यातील तिची दमदार अदा चाहत्यांना चांगलीच भावली आहे. यातील अभिनेत्रीच्या सुंदर आणि दमदार अदांनी अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. अगदी कमी कालावधीत या व्हिडिओवर हजारो लाईक्स आले आहेत. तसेच चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या कौतुकांचे पूल बांधत आहेत.
‘या’ नाटक कंपनीद्वारे अभिनय कारकिर्दीला सुरुवात
अक्षयाच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाले, तर तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले. या भूमिकेतून तिने अल्पावधीतच लाखो रसिकांची मने जिंकली आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राडाच! शाहिद कपूरचा भावासाेबत जबरा डान्स, व्हिडिओ पाहून तुमचेही पाय थिरकतील
मौनी रॉयचा वन पीसमध्ये धुराळा! पाहणाऱ्याचीही उडेल झोप