न्यूयॉर्कच्या घरात अभिनेत्री अलाया एफने केलाय भूतांचा सामना; भयानक घटना ऐकुण तुमचाही सुटेल थरकाप


बॉलिवूडमध्ये अनेक हॉरर चित्रपट बनले आहेत. जे पाहून कोणाचाही थरकाप सुटेल. अनेक कलाकारांनी रूपेरी पडद्यानर भुताचे पात्र निभावून लोकप्रियता मिळवली आहे. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केले आहे. पण विचार करा, जर तिची भूतं आपल्या आयुष्यात समोर आली तर??? काय, विचार करूनच भीती वाटली ना. पण असाच काहीसा अनुभव बॉलिवूड अभिनेत्री अलाया एफ हिला आला आहे. तिच्या आयुष्यातील हा अनुभव तिने सर्वांसोबत शेअर केला आहे.

पूजा बेदी यांची मुलगी अलाया एफ हीने सांगितले की, जेव्हा ती न्यूयॉर्कमध्ये होती तेव्हा तिने भूतांना सामना केला आहे. तिने सांगितले की, तिच्या घराच्या आजूबाजूला भूतं राहत होती. तिला रोज त्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ती खूप घाबरली होती.

अलायाने तिच्या मुलाखतीत सांगितले की, ती न्यू याॅर्कला शिक्षणासाठी गेली होती. त्यावेळी तिने काही भयानक गोष्टी अनुभवल्या आहेत. ज्या फक्त तिलाच दिसत होत्या. तिने सांगितले की, “मी जेव्हा न्यू याॅर्कमध्ये शिक्षण घेत होते, तेव्हा माझ्या अपार्टमेंटमध्ये एक भूत राहत होते. मध्यरात्री मला कोणाच्या तरी जोरजोरात चालण्याचा आवाज यायचा. कधी कधी अचानक माझ्या बाथरूममधील शॉवर चालू होत होता.” (Alaya F facing ghost when she was in new york)

या नंतर तिने सांगितले की, “मला एके दिवशी असे वाटले की, कोणीतरी वाऱ्याच्या वेगाने माझ्या मागे पळत आहे. त्यावेळी माझ्या सोबत माझी एक मैत्रीण होती. मी तिला विचारले की, तुला काही दिसले का ?? यावर ती म्हणाली की, मला काहीच दिसले नाही. परंतु काही वेळा नंतर मला जाणवले की, कोणीतरी मला स्पर्श करून माझ्या मागून पळत गेले आहे.”

ती पुढे म्हणाली की, “त्या दिवसानंतर मला असे समजले की, तिथे काहीतरी गडबड आहे. त्यानंतर मी खरचं खूप घाबरले होते. मी कधीच परत त्या घरात जाणार नाही.”

अलाया एफने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने सैफ अली खान आणि तब्बूच्या मुलीचे पात्र निभावले होते. या चित्रपटात तिला बेस्ट फिमेल डेब्युचा फिल्म फेअर अवॉर्ड देखील मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-गायक रोहित राऊत गिरवतोय प्रेमाचे धडे! जाणून घ्या कोण आहे त्याच्या आयुष्यातील ‘ती’ खास व्यक्ती

-‘धाकड’ सिनेमासाठी अर्जुन रामपालचे गजब ट्रान्सफॉर्मेशन; नवीन लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणेही झाले कठीण

-अभिनेता वरुण सूदला झाली गंभीर दुखापत; ‘खतरो के खिलाडी’ शोमध्ये स्टंट करताना झाला अपघात


Leave A Reply

Your email address will not be published.