काय सांगता? बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत जोडलं जातंय ‘या’ अभिनेत्रीचं नाव; ती म्हणतेय, ‘आम्ही दोघे खुप…’

काय सांगता? बाळासाहेब ठाकरेंच्या नातवासोबत जोडलं जातंय 'या' अभिनेत्रीचं नाव; ती म्हणतेय, 'आम्ही दोघे खुप...'


बॉलिवूडमध्ये नेहमी कलाकारामंध्येच अफेयर्सच्या चर्चा रंगतात. दररोज कलाकारांच्या नवनवीन जोड्या तयार होतात आणि तुटतात देखील. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली की लगेच कलाकारांची नावे जोडून अफेयरच्या बातम्या देखील यायला लागतात. कलाकारांसाठी अशा गोष्टी खूप सामान्य आहे. किंबहुना फक्त कलाकरच नाही तर स्टार किड्सच्या देखील अफेयरच्या बातम्या बऱ्यापैकी येत असतात.

सध्या अशीच एका अभिनेत्रीच्या अफेयरच्या बातमीने जोर धरला आहे. ही अभिनेत्री आहे ‘जवानी जानेमन’ सिनेमातील आलिया फर्निचरवाला. होय पूजा बेदीची मुलगी असलेली आलिया सध्या तिच्या अफेयरच्या बातम्यांमुळे पुन्हा लाईमलाइटमध्ये आली आहे. परंतू, तिच्या अफेअरची चर्चा सर्वाधिक होण्यास कारणीभूत आहे, ते तिच नाव ज्या व्यक्तीसोबत जोडलं जातंय, तो व्यक्ती.

ही व्यक्ती दुसरं तिसरं कोणीही नसून चक्क स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे हेच असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून आलिया आणि ऐश्वर्य याच्या अफेयरच्या चर्चा जोरदार सुरु आहेत.

ऐश्वर्य हा स्मिताताई ठाकरे यांचा मुलगा आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे. झाले असे की ही सर्व चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे होत आहे. स्मिता ठाकरे यांनी ऐश्वर्यच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला शुभेच्छा देताना एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

यावेळी त्यांनी लिहिले, “मुलाचा वाढदिवस” त्या व्हिडिओसोबत त्यांनी अनेक हॅशटॅगचा वापर केला. त्यात ऐश्वर्य ठाकरे, आलिया, फैजल जरूनी आणि प्रशिता चौधरी यांच्या नावाचा समावेश आहे. यासोबतच काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. ज्यात आलिया आणि ऐश्वर्य रोमँटिक पोज देताना दिसत आहे. यावरून त्यांच्या अफेयरच्या बातम्या येत आहे.

यासर्व बातम्यांवर आलियाने मौन सोडले असून, तिने या बातम्या केवळ अफवा असल्याचे सांगितले आहे. आलियाने सांगितले की, “मी आणि ऐश्वर्य फक्त मित्र आहोत. आमचे कुटुंबीय देखील एकमेकांना ओळखतात. आम्ही दोघे लहानपणापासूनच ओळखतो. आम्ही एकत्रच डान्स क्लासला जायचो, अभिनयाचे प्रशिक्षण देखील आम्ही सोबतच घेतले आहे. एवढ्या मोठ्या ओळखीमुळे आम्ही मित्र असणारच ना? माझ्यावर अशा बातम्यांचा काहीच परिणाम होत नाही. मला आणि माझ्या जवळच्या लोकांना सत्य माहिती असल्यामुळे मी बाकीच्यांना काय वाटेल किंवा काय वाटते याचा विचार करत नाही.”

आलियाने सैफ अली खानसोबत ‘जवानी जानेमन’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यात सैफने तिच्या वडिलांची तर तब्बूने तिच्या आईची भूमिका केली आहे. अजून तिच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली नाहीये.


Leave A Reply

Your email address will not be published.