आलिया भट्टच्या ‘फिटनेस चॅलेंज’ला २० दिवस पूर्ण; बदल पाहून मलायका आणि कॅटरिनाने देखील केले कौतुक


प्रत्येकजण विकेंडसाठी काही ना काही खास प्लॅन बनवत असतो. काहींना या दिवशी उशिरापर्यंत झोपायचे असते, तर काहींना फिरायला जायचे असते. परंतु बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा विकेंड काही वेगळ्याप्रकारे सुरू होतो. याची झलक तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून शनिवारी (१७जुलै) सकाळी दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. (Alia Bhatt complete her 20 days of sofitchallege 40, share photo on social media)

आलिया भट्टने एक मिरर सेल्फी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये ती एकदम फिट दिसत आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा जिम ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “२० दिवस पूर्ण आणखी २० दिवस बाकी.” तसेच तिने #sofit40daychallenge हे हॅशटॅगही दिले आहे.

आलिया ही ४० दिवसाचे फिटनेस चॅलेंज करत आहे. या चॅलेंजला आज २० दिवस पूर्ण झाले आहे. या दिवसातील तिचा बदल तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते, तसेच कलाकार प्रतिक्रिया देत आहे. तिच्या या फोटोवर फिटनेस क्वीन मलायका अरोरा आणि कॅटरिना कैफ यांनी फायर ईमोजी पोस्ट करून तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. तसेच तिचा हा फोटो चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. सगळे तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत.

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘स्टूडेंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने वरून धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केले आहे. याच एकाच चित्रपटाने तिला खूप ओळख मिळाली. यानंतर तिने ‘बद्रीनाथ की दुल्हनीया’, ‘टू स्टेटस’, ‘डियर जिंदगी’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘हाय वे’, ‘गल्ली बॉय’, ‘कलंक’, ‘राजी’, ‘शानदार’, ‘कपूर ऍंड सन्स’ या चित्रपटात काम केले आहे. यासोबतच तिने ‘आरआरआर’ आणि ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटात काम केले आहे. तिचे हे दोन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गणपती बाप्पा मोरया!’ लग्नानंतर राहुल वैद्यने मंत्रमुग्ध आवाजात केली गणेशाला प्रार्थना; व्हिडिओ होतोय इंटरनेटवर व्हायरल

-‘ये हवायें, गुनगुनाए, पूछे तू है कहाँ!’ शिवानी बावकरच्या दिलखेचक अंदाजावर चाहते फिदा

-कॅटरिना कैफ अन् विक्की कौशल लवकरच लग्न करणार?? सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलोकडून मिळाले संकेत


Leave A Reply

Your email address will not be published.