आदित्य अन् अनुष्काच्या संगीत कार्यक्रमात गर्ल्स गँगसोबत आलिया भट्टने मारले जोरदार ठुमके, पाहाच


अनुष्का रंजन कपूर आणि आदित्य सील लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या आधी त्यांचे मेहेंदी संगीताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक कलाकारांनी त्यांच्या या फंक्शनमध्ये हजेरी लावली आहे. यात आलिया भट्टने देखील हजेरी लावली आहे. या संगीतामध्ये आलिया भट्ट आणि इतर गर्ल गँगने जोरदार डान्स केला. त्यांचे हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

अनुष्का आणि आदित्यने लग्नाच्या एक दिवस आधी त्यांच्या या संगीत फंक्शनचे आयोजन केले आहे. या वेळी टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार आले आहेत. यावेळी आलिया भट्टने तिच्या मैत्रिणींसोबत जोरदार डान्स केला आहे. त्यांनी नवरीला स्पेशल फिल करण्यासाठी राणी मुखर्जीच्या गाण्यावर डान्स केला आहे. (Alia Bhatt enjoying anushka and aditya’s music ceremony, video viral on social media)

संगीत सोहळ्यामधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये नवरीसोबत तिची बहीण आकांशा रंजन, आलिया भट्ट आणि वाणी कपूर ‘साथिया’ चित्रपटातील ‘छलका छलका रे कलसी का पाणी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या संगीत फंक्शनमध्ये आलिया डान्स फ्लोरवर एकदम बिनधास्त अंदाजात डान्स करत आहे. तिच्या या डान्सचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

अनुष्का रंजन अभिनेता आणि दिग्दर्शक शशी रंजन यांची मुलगी आहे. तसेच आदित्य सील हा एक अभिनेता आहे. त्याने ‘तुम बिन २’, ‘नमस्ते लंडन’, ‘स्टूडेंट ऑफ द इअर’, ‘इंदू की जवानी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. आदित्य आणि अनुष्काची भेट साडे तीन वर्षापूर्वी एका फंक्शनमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

आलिया भट्ट ही लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’, या चित्रपटात दिसणार आहे. यासोबतच फरहान अख्तर याच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत ती दिसणार आहे. तसेच ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा


Latest Post

error: Content is protected !!