आलियाने केला योगा व्हिडिओ शेअर, पण योगापेक्षा घराचीच होतेय सर्वाधिक चर्चा


सोमवारी (२१ जून) संपूर्ण जगात जागतिक योगा दिन साजरा होत आहे. योगा ही भारतीयांनी जगाला दिलेला एक अलौकिक देणगी आहे. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जाते. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. शरीराबरोबरच मनाचे स्वास्थ्य जपणारा योगा सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनाचा एक भाग होत आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री फिटनेससाठी योगाभ्यास करताना दिसतात. आज या दिनाचे औचित्य साधून अनेक अभिनेत्रींनी त्यांचे योगा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

सिनेसृष्टीची ‘बबली गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया भट्टने देखील तिचा योगा करतानाच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘वशिष्ठासन’, ‘नौकासन’, ‘धनुरासन’, ‘वृक्षासन’ आणि ‘उत्तानासन’ हे योगा प्रकार करताना दिसत आहे.

आलियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचे या व्हिडिओवर फॅन्ससोबतच नीतू कपूर, रिद्धिमा साहनी कपूर यांनी कमेंट केली आहे. सोबतच या व्हिडिओमधून दिसणारी आलियाच्या घराची झलक देखील नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

आलिया जिथे योगा करत आहे. ती रूम खूपच सुंदर असून त्या रूमची सजावट युरोपियन थीमनुसार केली गेली आहे. त्या रूममध्ये एक मोठा पिवळ्या रंगाचा सोफा असून कॉन्ट्रास्टमध्ये नेव्ही ब्लू रंगाच्या खुर्च्या लावलेल्या दिसत आहेत.

आलिया या घरात २०१९ मध्ये शिफ्ट झाली होती. तिने या घराची माहिती तिच्या यूट्यूब चॅनेलवर दिली होती. आलियाचे हे घर तयार होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला होता. आलियासोबत तिच्या घरात तिची बहीण शाहीन देखील राहते. या व्हिडिओमध्ये अजून एक लक्षवेधी बाब म्हणजे आलियाचे पाळीव मांजर एडवर्ड.

आलियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर ती आणि रणबीर कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत. आगामी काळात आलिया रणबीर कपूरसोबत अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘चूक भूल माफ करा’, म्हणत गाणं गाताना दिसली ‘स्वीटू’; सुमधूर व्हिडिओला नेटकऱ्यांची पसंती

-असे काय झाले की, नेहा कक्कर लागली रडू? व्हिडिओला मिळाले ७६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-निलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी!’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.