नुसती मदतच केली नाही तर बच्चन ‘या’ कोविड सेंटरमधील पेशंटची रोज करतात विचारपुस


देशात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. हा विषाणू खूपच आक्रमकरीत्या वाढत आहे. रुग्णांची संख्या देखील खूप वाढत आहे. त्यामुळे सरकारने अनेक कडक निर्बंध लादले आहेत. कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी अनेकांचे हात सरसावले आहेत. अनेक कलाकार देखील मदत करत आहे. अनेकजण कोरोना रुग्णांच्या सोयी सुविधांचा पुरवठा करत आहेत तर काहीजण मानसिक आधार देत आहेत.या सगळ्या परिस्थितीत सोनू सुद मागच्या वर्षी पासून कोरोना रुग्णांना मदत करत आहे.

या परिस्थितीत सगळेजण अमिताभ बच्चन यांना खूप ट्रोल करत होते की, देशातील जनता त्यांना खूप प्रेम देते. पण आज ही वेळ आली आहे तर ते शांत बसले आहे. अजूनही त्यांनी कोणतीच मदत केली नाहीये. परंतु असे बोलणाऱ्या लोकांची त्यांनी बोलती बंद केली आहे. नुकतीच ही बातमी हाती आहे की, दिल्लीमधील एका कोव्हिड सेंटरला अमिताभ बच्चन यांनी दोन कोटी रुपये डोनेट केले आहेत.

एवढंच नाही तर ते दररोज फोन करून त्या कोव्हिड सेंटरची हालहवा विचारत असतात. या गोष्टीचा खुलासा इतर कोणी नाही तर दिल्ली शीख गुरूद्वारा मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंग यांनी केला आहे. मनजिंदर सिंग सिरसा हे शिरोमणी अकाली दलाचे राष्ट्रीय प्रवक्ता देखील आहेत.

मनजिंदर सिंग यांनी ट्विट करून लिहिले होते की,”शीख महान आहेत, शिखांच्या सेवेला प्रणाम.. हे शब्द होते अमिताभ बच्चन यांचे जेव्हा त्यांनी कोव्हिड केअर सेंटरसाठी दोन कोटी रुपयांचे योगदान दिले होते. दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच अमिताभ बच्चन हे मला रोज फोन करून इथल्या सोयी सुविधांची विचारपुस करतात.”


Leave A Reply

Your email address will not be published.