Sunday, June 23, 2024

‘सनीचा हॉट आणि शानदार शॉट!’ अभिनेत्रीने केला ग्लॅमरस फोटो शेअर; मिळाले १४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स

बॉलिवूड कलाकार अभिषेक बच्चन, विद्या बालन, विकी कौशल नंतर आता फोटोग्राफर डब्बू रत्नानीने 2021 कॅलेंडर मधून एक नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये ती कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये असणाऱ्या सनीच्या या फोटोंना काही तासातच लाखोंपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

फोटोग्राफर डब्बू रत्नानी आणि सनी लिओनी या दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. सनीने वार्षिक कॅलेंडरमधील तिचा फोटो शेअर करून म्हटले की, “गर्मी आली आहे.” यासोबतच तिने तिच्या पोस्टमध्ये हॅश टॅग #dabbooratnanicalendar2021 आणि #sunnyleone हे लिहिले आहे.

 

यासोबतच डब्बू रत्नानीने हा फोटो शेअर करून लिहिले की, “उन आत्म्यासाठी खूप चांगले आहे. परंतु तरीही एक मोठी टोपी घाला. सनी लिओनीचा हॉट आणि शानदार शॉट.” या फोटोमध्ये सनी खूपच हॉट दिसत आहे. नेहमी प्रमाणेच तिचे चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

खरं तर ही पहिली वेळ नाहीये जेव्हा सनीचे फोटो एवढ्या मोठ्या संख्येने व्हायरल झाले आहेत. याआधी देखील तिचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत होते आणि ते व्हायरल देखील झाले होते. सनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याने ती नेहमीच चाहत्यांसाठी तिचे फोटो शेअर करत असते

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागच्या वर्षी ‘बुलेट्स’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत करिश्मा तन्ना मुख्य भूमिकेत होती. तसेच ती विक्रम भट्टच्या ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. यासोबतच मल्याळम चित्रपट ‘शिरो’ आणि तमिळ चित्रपट ‘विरमादेवी’ यामध्ये दिसणार आहे. तसेच तिने बॉलिवूडमध्ये ‘जिस्म 2’, ‘हेट स्टोरी 2’, ‘रागिणी एमएमएस 2’, ‘एक पहेली लीला’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला प्रेग्नेंट राहायला आवडते का?’, म्हणणाऱ्या युजरची अभिनेत्रीने केली बोलती बंद; म्हणाली, ‘आता बास…’

-‘तुम्ही त्याचा टीआरपीसाठी वापर केला आणि…’, पवनदीपच्या परफॉर्मन्सवर कात्री चालवणाऱ्या निर्मात्यांवर भडकले चाहते

-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत

हे देखील वाचा