Friday, March 29, 2024

कर्जबाजारी झालेल्या अमिताभ यांना यश चोप्रांच्या ‘मोहब्बते’ने दिला होता मदतीचा हात

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांचा आज स्मृतिदिन. यश चोप्रा हे हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचे दिग्दर्शक होते. अनेक मोठमोठ्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. अनेक दमदार अभिनेते त्यांनी हिंदी चित्रपट क्षेत्राला दिले. 2012 मध्ये त्यांनी अचानक या जगाचा निरोप घेतला. चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांना त्यांनी मदत केली होती. खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांचासुद्धा अडचणीच्या वेळी यश चोप्रा देवदूता सारखे धावून आले होते. याबद्दलचा खुलासा अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत बोलताना केला होता.

दिग्दर्शक यश चोप्रा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्राचा चेहरा बदलण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. चित्रपटात अतिरिक्त मसाला नसूनही रोमँटिक चित्रपटांची निर्मिती करण्याची किमया त्यांनी केली. आज यश चोप्रा यांची 9वी पुण्यतिथी. अनेक छोट्या कलाकारांना संधी देऊन यश चोप्रा यांनी त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. इतकेच नव्हेतर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी देखील अडचणीच्या काळात ते मदतीला धावून येत त्यांनी अमिताभ बच्चन यांना मदतीचा हात दिला होता.

अमिताभ बच्चन यांनी 1990 साली त्यांची स्वतःची एक ABLC नावाची प्रॉडक्शन कंपनी चालू केली होती. त्या कंपनीबद्दल त्यांनी अनेक स्वप्नं पाहिली होती. परंतु कंपनीच्या कामात यश न आल्याने अमिताभ बच्चन यांच्या सगळया स्वप्नांचा चुराडा झाला होता. त्यांचे पूर्ण दिवाळे निघाले होते. या कंपनीसाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेली सगळी संपत्तीपणाला लावली असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्याकडे कोणते काम सुद्धा नसल्याने ते हताश झाले. या कठिण काळात यश चोप्रा त्यांच्या मदतीला धावून आले होते.

अमिताभ बच्चन यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले की, “माझ्या कठिण काळात यश चोप्रा यांनी मोठी मदत केली होती. त्यावेळी आलेल्या बिकट परिस्थितीमुळे मी प्रचंड तणावात होतो. पुढे काय करायचं मला काहीच समजत नव्हत. यावर पर्याय शोधत असताना माझ्या समोर यश चोप्रा यांच नाव आले. मी यश चोप्रांकडे गेलो आणि माझी सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. मी खुप अडचणीत आहे माझ्याकडे काही काम नाही. मला कामाची खुप गरज आहे. मला मदत करा अशी विनंती मी त्यांच्याकडे केली. त्यावेळी यश चोप्रा ‘मोहब्बते’ चित्रपटाची निर्मिती करत होते, ज्यामध्ये त्यांनी मला नारायण शंकर ही भूमिका साकारण्याची संधी दिली.”

या बिकट परिस्थितीबद्दल अमिताभ यांचा मुलगा अभिषेक बच्चनने सुद्धा खुलासा केला होता. त्या दिवसांची आठवण सांगताना एका मुलाखतीत अभिषेक म्हणाला की, “त्या कठीण काळात कुटुंबियांसमवेत राहण्यासाठी मला बोस्टन मधील कॉलेज सोडावे लागले होते. त्यावेळी कुटुंबीयांना कसलीही मदत करायला मी सक्षम होतो असे मला वाटत नव्हते. पण त्यांचा मुलगा म्हणून मला त्या कठिण काळात वडीलांसोबत राहून त्यांना जमेल तेवढी मदत करायची होती. म्हणूनच मी बोस्टन मधील कॉलेज सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला.”

दरम्यान, यश चोप्रा यांनी हिंदी चित्रपट क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती त्यांनी त्यांच्या काळात केली होती. अनेक नावाजलेल्या कलाकरांना उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही नक्की वाचा-
वैशाली ठक्करच्या आत्म’हत्येवर नाराज झाले मुकेश खन्ना; म्हणाले, ‘आयुष्यात अडचणी…’
‘करीना कपूरमुळे मी खूप पैसे कमावले’, पायल राजपूतचा माेठा खुलासा

हे देखील वाचा