Saturday, April 20, 2024

अमृता फडणवीसांचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, दिवाळीनिमित्त भक्तीत झाली तल्लीन

सध्या सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह लाेकांमध्ये पाहायला मिळत आहे. लाेक माेठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करत आहेत. लाेकांनमध्ये जल्लोष आणि आनंदाचे वातावरण  ठिकाठिकाणी पाहायला मिळत आहेत. घर, ऑफिस, मंदिर अशा विविध ठिकाणी केलेल्या सजावटने आणि दिव्यांच्या प्रकाशाने सर्व महाराष्ट्र उजळूत दिसत आहे. अशावेळी दिवाळी सणाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे लाेकांच्या भेटीला आले आहे. अमृता यांनी  स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कायमच त्यांच्या म्युझिक अल्बममुळे चर्चेत असतात. यावेळी दिवाळी आणि लक्ष्मी पुजनाच्या निमित्ताने अमृता यांचे नवीन गाणे यूट्युबवर प्रदर्शित झाले आहे. गाण्याचे बाेल ‘ॐ जय लक्ष्मी माता … ‘असे आहेत. अमृता यांनी त्यांच्या ट्विटरवर ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. या गाण्याची एक झलकही त्यांनी शेअर केली आहे.

 

अमृता फडणवीस यांनी गायलेलं गाणं प्रेक्षकांनमध्ये चागंलेच चर्चेत
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत #Diwali2022 #लक्ष्मीपूजेच्या शुभ प्रसंगी, #माझी लक्ष्मी आरती ऐका आणि दैवी भक्तीच्या भावनेत तल्लीन व्हा! प्रेमाने बोला, जय लक्ष्मी माता…!“ असे कॅप्शन ट्वीटला दिले आहे. अमृता यांनी गायलेले हे गाणे सध्या सर्वत्र चागंलंच चर्चेत आहे.

 

गाण्यावर चाहते करत आहेत लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव
अवघ्या काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या या गाण्याला भक्तांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. युट्यूबवरील या गाण्याला प्रंचड लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट करत ते गाणे फार चांगलं गायल्याचे सांगितले आहे.

यापुर्वीही ‘लव्ह यू लोकतंत्र’ या चित्रपटातील अमृता फडणवीस यांचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले हाेते. प्रदर्शित होताच त्यांच्या ‘ना जाने क्यू धडकता है दिल’ या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहायला मिळाला हाेता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘विराट, तुला सात खून माफ’, म्हणत बॉलिवूड सेलिब्रिटींनी गायलं विराटचं गुणगान

एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत लग्नात पोहोचली सुष्मिता सेन, ट्रोल्सने विचारले, ‘ललित मोदी आले नाहीत?’

हे देखील वाचा