बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडे चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. परंतु लोकप्रियतेच्या बाबतीत ती कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. मागील काही दिवसांपासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतेच तिचा बॉयफ्रेंड आयवर मॅक्रेसोबत साखरपुडा केला आहे. ते फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अलाना ही नेहमीच तिच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत प्रँक करत असते. असाच एक प्रँक तिने तिच्या आई-वडिलांसोबत केला आहे, जे ऐकून ते हैराण झाले होते.
अलाना एक युट्यूबर आहे. ती नेहमीच तिच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करत असते. अलानाने तिच्या कुटुंबासोबत प्रँक करण्याचा विचार केला. तिने तिच्या घरी सांगितले की, ती प्रेग्नंट आहे आणि तिच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया कॅमेरामध्ये कैद केल्या. हा व्हिडिओ देखील तिने युट्यूबवर शेअर केला आहे. यामागे तिचा बॉयफ्रेंड देखील सामील होता. (Ananya panday cousin Alanna panday pregnancy prank with family)
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अलाना सगळ्यात आधी तिच्या आईला बोलावते आणि म्हणते की, “मी प्रेग्नंट आहे.” हे ऐकून तिची आई आश्चर्यचकित होते आणि म्हणते की, “हे कसं होऊ शकतं? तुमचा साखरपुडा देखील झाला नाही.” ही गोष्ट ऐकून तिच्या आईला काहीच सुचत नाही. तिच्या आईचा प्रतिक्रिया पाहून अलानाला खूप हसायला येते आणि हे सर्व पाहून तिच्या आईला समजते की, अलाना काहीतरी मस्करी करत आहे. त्यानंतर सगळे मिळून खूप हसतात.
तिच्या आईनंतर अलानाने हा प्रँक तिच्या वडिलांसोबत देखील केला. तिला असे वाटले होते की, हे ऐकून तिचे वडील घाबरतील, परंतु त्यांनी खूप कूल प्रतिक्रिया दिली. तिच्या वडिलांनी हे ऐकून काहीच प्रतिक्रिया दिली नाही. उलट ते एकदम खुश दिसत होते. यानंतर तिने ही गोष्ट अनन्याला सांगितली. हे ऐकून ती देखील हैराण झाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-