एकाच दिवशी चार सिनेसृष्टीत पदार्पण करणार अनन्या पांडे, करण जोहरच्या ‘या’ चित्रपटातून करणार हा पराक्रम


चंकी पांडे यांची कन्या अनन्या पांडेने  ‘स्टुडंट ‘ऑफ द इयर २’ या बॉलीवूड चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. अल्पावधीतच तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच ती ‘खाली पिली’ या चित्रपटात देखील प्रमुख भूमिकेत दिसली होती, जो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने मागील काही दिवसांपूर्वीच आपल्या ‘लायगर’ या चित्रपटाची घोषणा केली होती. ज्यात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे आपल्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्या चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील पाहायला मिळला. या चित्रपटातून अनन्या पांडे चक्क एक दोन नव्हे तर तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा चार महत्त्वाच्या चित्रपट सृष्टीत प्रवेश करणार आहे. एका युवा अभिनेत्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. या चित्रपटात ती घातक शस्त्र आणि धमाकेदार एक्शनमध्ये दिसणार आहे.

आपल्या या चित्रपटाला घेऊन सुरुवातीला अनन्या पांडे ही फार घाबरली होती. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की , ” हिंदी चित्रपटसृष्टीत दोन वर्षीपूर्वी मी सुरुवात केली होती आणि लायगरच्या निमित्ताने मी इतर चार महत्वाच्या चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करणार आहे. नक्कीच ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी यासाठी अतिशय उत्साही आहे. त्यासोबतच चौपट धाकधूक देखील आहे. जणू माझ्या पोटात फुलपाखरे उडत असल्याची जाणीव मला होत आहे.”

पुढे ती म्हणते की,” मला वाटते की हे जग लहान झाले आहे. आपला भारत एक असा देश आहे, ज्यामध्ये इतक्या संस्कृती आणि खूप सारे प्रेम सामावले आहे. सोबतच विविध भाषा देखील आहेत या देशात आहेत आणि सध्या ओटीटीमुळे माझ्यासाठी खूप सार्‍या संधी निर्माण होत आहेत. लायगरच्या निमित्ताने मला विविध भाषांत लोकांपर्यंत पोहोचायला मिळाले यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.”

९ सप्टेंबर रोजी लायगर हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांच्या दिग्दर्शनाखाली थिएटरमध्ये धडक मारणार आहे. विजय आणि अनन्या यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने विजय हा बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यांच्यासह या सिनेमात रम्य कृष्णन, रोनित रॉय, विषु रेड्डी, आली आणि गेटअप श्रीनु देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

याशिवाय शकुन बत्राच्या चित्रपटामध्ये देखील ती दिसणार आहे. तिच्यासोबत दीपिका पादुकोन आणि सिद्धांत चतुर्वेदी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय पती पत्नी और वो आणि खाली पिलीमध्ये सुद्धा ती प्रमुख भूमिकेत झळकली होती.

 


Leave A Reply

Your email address will not be published.