Monday, March 4, 2024

ऍनिमलने मोडले सगळ्या सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड, सलग आठव्या दिवशी केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

अभिनेता रणबीर कपूरच्या (ranbir kapoor) ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाच्या आकडेवारीने हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांमध्ये हा चित्रपट रिलीजच्या आठव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातही ‘अॅनिमल’ चित्रपटाची रंगत कायम राहण्याची शक्यता आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी चित्रपटाची कमाई ‘टायगर 3’ च्या रिलीजच्या आठव्या दिवशीच्या कमाईपेक्षा दुप्पट आहे.

‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी म्हणजेच १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एकूण 337.58 कोटींची कमाई करत शानदार प्रदर्शन केले. एकट्या हिंदीमध्ये या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 300.81 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनने 500 कोटींचा आकडा पार केला आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. रात्री 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ‘अ‍ॅनिमल’ने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी जवळपास 23 कोटी रुपयांची कमाई केली आहे,

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा चित्रपट ‘पठाण’ जो या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी पहिला ब्लॉकबस्टर ठरला आहे, त्याने रिलीजच्या आठव्या दिवशी 18.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा विक्रम मोडीत काढत सनी देओलच्या ‘गदर 2’ चित्रपटाने रिलीजच्या आठव्या दिवशी 20.50 कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने रिलीजच्या आठव्या दिवशी 21.60 कोटींची कमाई केली होती. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने आठव्या दिवशीही कमाईचा हा विक्रम सुधारला असून शुक्रवारी सुरुवातीच्या ट्रेंडनुसार 23 कोटींची कमाई केली आहे. या वर्षातील उर्वरित दोन मोठ्या चित्रपटांपैकी सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटाचे कलेक्शन रिलीजच्या आठव्या दिवशी केवळ 10.50 कोटी रुपये होते.

‘अॅनिमल’ चित्रपटाच्या रिलीजच्या दुसऱ्या वीकेंडमध्ये शनिवार आणि रविवारी आणखी चांगली कमाई होण्याची शक्यता असून दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट जवळपास 150 कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज आहे. असे झाले तर हा चित्रपट ‘जवान’च्या दुसऱ्या आठवड्यातील कमाईला मागे टाकू शकतो. सध्या, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटाच्या सर्वाधिक कमाईचा विक्रम ‘जवान’ चित्रपटाच्या नावावर आहे, ज्याने आठ आठवडे थिएटरमध्ये असताना सुमारे 640.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

आलिया भट्टने शाहरुखसोबत काम करण्याचा तिचा अनुभव केला शेअर, किंग खानचे कौतुक करताना म्हटले ‘असे’ काही
2023 मध्ये ‘या’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केला कल्ला, जमवला करोडोंमध्ये गल्ला

हे देखील वाचा