श्रुती हासनने केला तिच्या टाईपच्या मुलासोबत डान्स! नक्की आहे तरी कोण हा??


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हासन होय. श्रुतीने अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिला अभिनयासोबतच डान्स आणि गाण्याची देखील खूप आवड आहे. अनेक वेळा ती सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच श्रुतीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.‌ ज्यात ती एकदम हटके अंदाजात दिसत आहे. ती एकदम हटक्या अंदाजात डान्स देखील करत दिसत आहे.

श्रुती हासनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये श्रुतीने एका एनिमेटेड एलियनसोबत बिनधास्त अंदाजात डान्स केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझ्या टाईपच्या मुलासोबत विकेड वाईब्स.” तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला तिचे चाहते एन्जॉय करताना दिसत आहेत. तिचे चाहते या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, “हा तुझ्या डान्सपैकी बेस्ट डान्स आहे.” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “ओएमजी ही तर क्रेझी आहे.”

श्रुती ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती अनेकवेळा तिचा बॉयफ्रेंड शांतनु हजारिका याच्यासोबत स्पॉट होत असते. नुकतेच काही दिवसांपूर्वी ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत मार्केटमध्ये गेली होती. तेव्हा तिथे तिने त्याला किस केले होते. त्यांचे हे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Shruti Hassan dancing with her type boy, video viral on social media)

माध्यमातील वृत्तानुसार श्रुतीने याआधी शेवटचे ‘वकील साहब’ या चित्रपटात काम केले आहे. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिने पवन कल्याणसोबत काम केले होते. हा तेलुगूमधील ‘पिंक’ चित्रपटाचा रिमेक होता. ती सध्या एक वेबसीरिजची शूटिंग करत आहे. या सोबतच ती प्रशांत नील दिग्दर्शित ‘सालार’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा पहिल्यांदा तुटले होते नुपूर सेननचे हृदय; मन हलके करत म्हणाली, ‘मला रात्री एक वाजता…’

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खान नाही, तर ‘हा’ कलाकार करणार ‘बिग बॉस १५’ होस्ट

-मीरा राजपूतने केली ओठांची सर्जरी? व्हि़डिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण


Leave A Reply

Your email address will not be published.