मेहेंदी रंगली गं! अंकिताच्या हातावर रंगली विकी जैनच्या नावाची मेहेंदी, पाहा फोटो


टेलिव्हिजनवरील ‘पवित्र रिश्ता’  (Pavitra Rishta)फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही घराघरात पोहचली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. अंकिता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना इंप्रेस करण्याची एकही संधी ती सोडत नाही. नवनवीन गोष्टी प्रेक्षकांसाठी ती नेहमीच शेअर करत असते. अशातच मागील अनेक दिवसापासून तिच्या लग्नाची चर्चा चालू आहे. ती तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न करणार आहे. अशातच त्यांच्या लग्नाच्या आधीचे कार्यक्रम चालू झाले आहेत.

अंकिता आणि विकी यांचा मेहेंदीच्या कार्यक्रम पार पडला आहे. त्यांच्या मेहेंदीच्या कार्यक्रमाचे काही फोटो अंकिताने इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विकी आणि अंकिता खूपच खुश दिसत आहेत. अंकिताने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला आहे. तसेच गुलाबी रंगाची ज्वेलरी घातली आहे. तिने हातावर पूर्ण मेहंदी काढलेली दिसत आहे. तसेच विकीने देखील तिच्या लेहंग्याच्या रंगानुसार ड्रेस घातला आहे. त्याने डोळ्यांवर गॉगल लावला आहे. या फोटोमध्ये ते दोघेही खूप खुश दिसत आहेत. (Ankita Lokhande’s mehendi ceremony photos viral on social media)

 

 

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आम्ही शेअर केलेल्या प्रेमामुळे आमचा मेहेंदी लूक आणखीनच खुलला आहे. अर्थपूर्ण आणि आठवणीत राहणारा.” त्यांच्या या फोटोंवर त्यांचे अनेक चाहते कमेंट करत आहेत. या मेहेंदी फंक्शनला अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि अमृता खानविलकर यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ते दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. सगळ्यांना आता त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे.

 

 

अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. या मालिकेतील त्यांचे मानव आणि अर्चना नावाचे पात्र खूप गाजले होते. यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तिने ‘मनिकर्णिका‌’या चित्रपटात काम केले. तसेच ती ‘बागी ३’ मध्ये देखील दिसली होती. या चित्रपटात तिने श्रध्दा कपूर, टायगर श्रॉफ, रितेश देशमुखसोबत काम केले होते.

हेही वाचा :

भूतलावर जणू अप्सरा अवतरली! सई ताम्हणकरचे फोटो पाहून तुमच्याही तोंडातून निघतील हेच उद्गार

नृत्याविष्कार करून मानसी पुन्हा एकदा चुकवणार प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका, दणकेबाझ टिझर आला समोर

वाढदिवशी कोणतेही कॅप्शन न देता शाहनाझने केला सिद्धार्थचा फोटो शेअर, सिडनाझ पुन्हा चर्चेत

 

 


Latest Post

error: Content is protected !!