Monday, June 24, 2024

अनुपमा मालिकेतील ‘किंजल’ बहूचा बोल्ड, ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

सामान्यांसाठी मालिका आणि त्यात असणारे कलाकार म्हणजे अगदी घरातील सदस्यच बनून जातात. मालिका देखील जणू काही आपल्याच घरात घडत असल्याचा (गैर)समज प्रेक्षकांचा होऊन जातो. यासोबतच सामान्य लोकांना नेहमीच कलाकारांबद्दल काही गैरसमज असतात. कलाकार हे जसे मालिकांमध्ये दिसतात, जशा भूमिका साकारतात तसेच ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात असतात. जसे की मालिकांमध्ये दिसणाऱ्या सध्या, सरळ, सोज्ज्वळ भूमिका करणाऱ्या, साड्यांमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री त्यांच्या रियल लाईफ मधेही तशाच असतात. मात्र असे नाहीये या अभिनेत्री त्यांच्या खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि आकर्षक दिसतात.

सध्या टेलिव्हिजन विश्वात तुफान गाजणाऱ्या ‘अनुपमा’ मालिकेतील अनुपमाची सून असणारी ‘किंजल’ मालिकेत जरी आजच्या आधुनिक काळातील मुलगी असली तरी तिची भूमिका आजच्या मुलींना साजेशीच आहे. मात्र हीच किंजल अर्थात निधी शाह तिच्या खऱ्या आयुष्यात किंजलपेक्षा जास्त मॉडर्न, ग्लॅमरस आणि बोल्ड आहे.

सोसहल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी निधी सतत तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करून सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. काही दिवसांपूर्वीच निधीने सोशल मीडियावर तिचा एक मादक आणि बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बाथरूममध्ये शॉवरखाली उभी असून, तिच्यावर पाणी पडत आहे. या फोटोमध्ये तिचे ब्लॅक रंगाचे भरलेत दिसून येत आहे. या अवतारात तिने दिलेले एक्सप्रेशन नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. याआधी देखील निधीने तिचे अतिबोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी निधीचा दिवाळी लूक देखील तुफान व्हायरल झाला होता.

निधी अनुपमा मालिकेत अनुपमाच्या सुनेची भूमिका साकारत असून, ती देखील अनुपमा सारखीच संस्कारी घराला जोडून ठेवणारी आहे. तिला काव्य दुसरी अनुपमा देखील म्हणते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-अरे देवा! पुन्हा पोस्टपॉन झालं आलिया अन् रणबीरचं लग्न, काय आहे नेमकं कारण?

हे देखील वाचा