‘जेव्हा करंगळी बेडच्या कोपऱ्याला आपटते…!’ स्वीटूच्या भन्नाट एक्सप्रेशन्सवर उमटतायेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया


‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर होय. या मालिकेतील तिचे ‘स्वीटू’ हे पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहे. तसेच ‘ओम’ आणि ‘स्वीटू’च्या लव्हस्टोरीला देखील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. अभिनेत्री अन्विता फलटणकर ही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. या ठिकाणी ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. तिच्या पोस्टही चाहत्यांकडून खूप पसंत केले जातात. (anvita phaltankar shared her cute expressions on instagram see here)

नुकताच अन्विताने एक फोटो शेअर केला आहे. सोबतच तिने अतिशय मजेदार असं कॅप्शनही याला दिलं आहे, त्यामुळे या फोटोला चाहत्यांचा प्रतिसाद मिळत आहे. या फोटोमध्ये स्वीटूने काळ्या रंगाची साडी आणि सोबतच काळे ब्लाऊज परिधान केलं आहे. या साडी लूकमध्ये अन्विता नेहमीप्रमाणे गोंडस आणि सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तिने विचित्र एक्सप्रेशन्स दिले आहेत. ज्यात ती खूपच क्युट दिसत आहे.

हा फोटो शेअर करत अन्विताने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “जेव्हा करंगळी बेडच्या कोपऱ्याला आपटते…” असे म्हणत तिने हसण्याचे इमोजीही बनवले आहेत. या फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आतापर्यंत या फोटोवर १७ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

अन्विताच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने नाटकांपासून ते बऱ्याच चित्रपटामध्ये अभिनय करून, रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तिने रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. यानंतर ‘गर्ल्स’ या चित्रपटात ती ‘रुमी’च्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. याशिवाय अन्विताने ‘चतुर चौकडी’ आणि ‘रुंजी’ या मालिकेतही काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.