‘शर्लिन चोप्रा’पासून ते ‘पूनम पांडे’पर्यंत ‘या’ अभिनेत्रींना झाली होती पोलीस कोठडी; कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन


अभिनेत्री ‘शर्लिन चोप्रा’ ही बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय आणि मॉडेलिंगसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. शर्लिन ही आजकाल तिच्या अश्लील व्हिडिओमुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. जुलै 2012 मध्ये ती एका मॅगझिनसाठी न्यूड पोज देणारी पहिली भारतीय महिला होती. शर्लिनचा एक व्हिडिओ एका फ्री पॉर्नग्राफी वेबसाईटवर मिळाला, त्यामुळे तिच्या विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली होती. हा सगळा प्रकार ऑक्टोंबर 2020 पर्यंत चालू होता. त्यानंतर शर्लिनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेमध्ये शर्लिन चोप्राने सांगितले होते की, “मी एका इंटरनॅशनल वेबसाईटसाठी ऍडल्ट कंटेंट बनवत आहे. ज्या फ्री वेबसाईटवर व्हिडिओ आहे, तो कोणीतरी चोरून अपलोड केला आहे.” दुसरीकडे निवृत्त कस्टम अँड सेंट्रल एक्साइज ऑफिसर मधुकर केनी यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले आहे की, “या वेबसाईटवर शर्लिनचं नाव टाकलं, तर तिचे अनेक अश्लील व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.” शर्लिन चोप्राने या आधीही अनेक असे अश्लील व्हिडिओ केल्यामुळे ती चर्चेत होती. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अश्लील व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहेत, जाऊन घेऊया अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल…

पूनम पांडे
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री पूनम पांडेच्या विरोधात गोव्याच्या कानाकोनामध्ये अश्लील व्हिडिओ केल्यामुळे तक्रार दाखल झाली होती. यामध्ये पूनमसोबत आणखी काही जणांना देखील अटक झाली होती. तिने ज्या जागी हा व्हिडिओ शूट केलता ती सरकारी जागा होती, तेव्हा तिथे उभे असणाऱ्या दोन पोलीस कर्मचारी ही निलंबित केले होते.

गहना वशिष्ठ
‘गंदी बात’ सारख्या सीरिजमध्ये काम केलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला 6 फेब्रुवारीला अटक करण्यात आले होते. 7 फेब्रुवारीला तिला कोर्टात दाखल केले, आणि 10 फेब्रुवारीला गहनाला पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. गहनाने 87 पॉर्न व्हिडिओ शूट केलं आहेत. ते तिने तिच्या वेबसाईटवर अपलोड केले होते. ते व्हिडिओ बघण्यासाठी पेड सबस्क्राईबर्स लागणार होते. ज्याचा चार्ज 2000 रुपये एवढा होता. पोलिसांनी असे सांगितले होते की, ‘ज्या मुली लोकप्रिय होण्यासाठी मेहनत घेतात, त्यांना गहना लाच देऊन पॉर्न व्हिडिओ शूट करायला लावायची. तिच्या या कामाच्या बदल्यात तिला प्रत्येक चित्रपटाकडून 15 ते 20 हजार मिळायचे.’

नंदिनी कुरील
सन 2018 साली मॉडेल नंदिनी कुरील हिचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ नंदिनीने महाकाल मंदिराच्या आरतीनंतर शूट केला होता. या मंदिरात मोबाईल फोन घेऊन जाण्यास मनाई होती, तरी देखील नंदिनीने मोबाईल घेऊन गाण्यांवर अनेक बोल्ड व्हिडिओ बनवले होते.

मिलिंद सोमण
मॉडेल मिलिंद सोमण हे आपल्या 55 व्या वाढदिवसाच्या दिवशी गोव्याच्या बीचवर बिना कपड्याचे उतरले होते. त्यानंतर गोवा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाजीगरमधल्या ‘छुपाना भी नहीं आता’ गाण्यातील अभिनेत्याने अगदी कमी वयातच सोडले जग, वाचा त्याची कहानी

-पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ सुखी संसार करुन घटस्फोट घेणारे बॉलीवूड तारे, एकाचा संसार तर २२ वर्षांनी मोडला

-चित्रपटसृष्टीला बहारदार संगीत देणारे ‘मोहम्मद खय्याम’, त्यांच्या जबरदस्त संगीताने केली प्रेक्षकांवर जादू


Leave A Reply

Your email address will not be published.