Saturday, February 22, 2025
Home अन्य ‘तुला कॉमेडी जमत नाही’, म्हणत अभिनेत्याने केला होता अर्चना पुरण सिंगचा अपमान, वाचा काय होता किस्सा

‘तुला कॉमेडी जमत नाही’, म्हणत अभिनेत्याने केला होता अर्चना पुरण सिंगचा अपमान, वाचा काय होता किस्सा

कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कार्यक्रमात कपिल शर्मा तर लक्ष वेधून घेत असतोच त्याचबरोबर अभिनेत्री अर्चना पुरण सिंगही अनेक मजेशीर किस्से सांगून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.  या कार्यक्रमात अनेक वर्षांपासून परिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या अर्चना पुरण सिंगचे (Archana Puran Singh) सोशल मीडियावर अनेक चाहते पाहायला मिळतात. आपल्या बोलण्याने आणि जबरदस्त कॉमेडिने ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते मात्र अलिकडेच अर्चना सिंगने तिच्या पहिल्या कार्यक्रमाचा प्रसंग प्रेक्षकांना सांगितला ज्यामध्ये एका अभिनेत्याने तिचा सर्वांसमोर कडक शब्दात अपमान केला होता. काय होता तो किस्सा चला जाणून घेऊ. 

अर्चना लवकरच शेखर सुमनसोबत ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’मध्ये दिसणार आहे. हा शो सध्या सुरू असलेल्या द कपिल शर्मा शोची जागा घेईल जेव्हा कपिल शर्माची टीम लवकरच वल्ड टूरवर निघेल. या आपल्या नविन कार्यक्रमाबद्दल बोलताना अर्चनाने सांगितले की “मला वाटतं की रंगमंचावर नवीन कलाकाराला प्रेरित करणं खूप गरजेचं आहे. एखादं लहान मूल कविता वाचत असतानाही आणि तुम्ही त्याला दाद दिली नाही, तर त्याला थोडं अस्वस्थ वाटू लागतं.” त्याचप्रमाणे मी परिक्षकाच्या आसनावर बसल्यावर, मला प्रत्येक स्पर्धकाबद्दल आपुलकी वाटते आणि हास्याच्या रूपात थोडी प्रेरणा स्पर्धकाला परफॉर्म करण्यास मदत करते. मला आठवते 80 च्या दशकात मी ‘मिस्टर येस मिसेस’ शो म्हणायचे आणि मला एक कॉमिक सीन करायचा होता आणि एक अभिनेता म्हणाला मी कॉमेडी कशी करावी हे तुला माहित नाही.”

याबद्दलच बोलताना अर्चना पुढे म्हणाली की, “त्यांना वाटले की काही एक्स्प्रेशन्स करणे म्हणजे कॉमेडी नाही आणि त्यानंतर मी जास्त काळ कॉमेडी करू शकले नाही कारण मला भीती वाटत होती की मी कोणाला हसवू शकणार नाही. पण, जसजसा वेळ निघून गेला, तसतसे मला जमले. त्यासाठी धाडस आणि कठोर परिश्रम घेतले आणि मला आठवते की हा शो कॉमेडीचे उत्तम उदाहरण होते आणि माझ्या कामाबद्दल माझे कौतुकही झाले.” 1988 मध्ये ‘मिस्टर या मिसेस’ मधून पदार्पण केल्यानंतर अर्चनाने झी हॉरर शो आणि जुनून सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. 1998 मध्ये, तिने करण जोहरच्या दिग्दर्शनातील पदार्पण ‘कुछ कुछ होता है’ मध्ये एक भूमिका साकारली होती. तिचे पात्र, मिस ब्रिगांझा हे लोकप्रिय हिंदी चित्रपटातील सर्वात प्रतिष्ठित पात्रांपैकी एक आहे. अलीकडे अर्चना टीव्ही शोमध्ये सक्रियपणे काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा