Monday, September 25, 2023

बॉलिवूडमधील ‘हा’ हँडसम अभिनेता वयाच्या 50 व्या वर्षी झाला चौथ्यांदा बाबा, गर्लफ्रेंडने दिला बाळाला जन्म

मनोरंजनविश्वात सध्या अनेक लोकप्रिय कलाकार आई बाबा होत आहेत. नुकतेच अभिनेता वत्सल सेठ आणि अभिनेत्री इशिता दत्ता एका मुलाचे आई बाबा झाले आहेत. आता पुन्हा एकदा बॉलिवूडमधून एक अशीच सुखद बातमी मिळत आहे. ती म्हणजे बॉलिवूडमधील हँडसम आणि स्टायलिश अभिनेता अशी ओळख असणारा अर्जुन रामपाल पुन्हा एकदा बाबा झाला आहे.

अर्जुनची गर्लफ्रेंड असलेल्या मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. या बाळाच्या आगमनामुळे अर्जुन चौथ्यांदा तर गॅब्रिएला दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. अर्जुन आणि गॅब्रियलचे हे दुसरे बाळ आहे. याआधी या जोडप्याला तीन वर्षांचा मुलगा आहे, आता पुन्हा त्यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. गॅब्रिएलाने २० जुलै रोजी मुलाला जन्म दिला आहे. तिच्या या डिलिव्हरीबद्दल अर्जुनने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

अर्जुन रामपालने त्याच्या ट्विटवर ट्विट करताना लिहिले, “मला आणि माझ्या कुटुंबाला आज एका मुलाच्या रूपात सुंदर आशीर्वाद मिळाला आहे. आई आणि मुलगा दोघेही उत्तम आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद,” या सोबतच त्याने #20.07.2023 आणि #helloworld असे हॅशटॅग देत hello world लिहिलेल्या एका टॉवेलचा फोटो पोस्ट केला आहे.

अर्जुनच्या या ट्विटनंतर त्याच्यावर आणि गॅब्रिएलवर इंडस्ट्रीसोबतच त्याच्या फॅन्सने देखील अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. दरम्यान मुख्य बाब म्हणजे अर्जुन आणि गॅब्रिएलने लग्न केलेले नाही. मागील अनेक वर्षांपासून ते रिलेशनशिप मध्ये आहेत. याआधी देखील त्यांना एक मुलगा झाला आहे. २०१८ सालापासून ते नात्यात असून २०१९ साली त्यांना पहिला मुलगा झाला होता.

गॅब्रिएल आधी अर्जुनने मॉडेल मेहेर जेसियाशी लग्न केले होते. त्या दोघांना दोन मुली आहेत मात्र लग्नाच्या काही वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तो गॅब्रिएलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुनच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तो लवकरच अब्बास मस्तान यांच्या अपकमिंग सिनेमा ‘पेंटहाऊस’मध्ये बॉबी देओलसोबत दिसणार आहे. याशिवाय तो आगामी स्पोर्ट्स ऍक्शन सिनेमा ‘क्रिक’मध्ये दिसणार आहे. यात विद्युत जमवाल आणि जॅकलिन फर्नांडिस देखील असतील.

अधिक वाचा- 
‘डोकं सुन्न झालंय,सगळे सुखरुप असुदेत…’; इर्शाळवाडी दुर्घटनेबाबत मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
मणिपूरच्या ‘त्या’ घटनेवर अनुपम खेर भडकले; पोस्ट करत म्हणाले,’लज्जास्पद…’

हे देखील वाचा