क्यूटनेसच्या बाबतीत ‘हा’ स्टारकिड देतोय तैमूरला टक्कर; पाहा आयेशा टाकियाच्या मुलाचे फोटो


आजकाल बॉलिवूडमध्ये स्टार्स प्रमाणेच स्टारकिड्सची देखील जोरदार चर्चा रंगलेली असते. अगदी जन्मापासूनच ते मीडियासोबत जोडलेले असतात. ते जिथे कुठे जातात, जे काही करतात या सगळ्या हालचालींवर मीडियाची नजर असते. स्टारकिडच्या लोकप्रियतेत पाहायला गेलं, तर सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा तैमूर टॉपला आहे. साडे चार वर्षांचा तैमूर आज लाईमलाईटमध्ये आहे.

आजपर्यंत कोणताच लहान स्टारकिड तैमूरला टक्कर देऊ शकला नाहीये. पण आता तैमूरला टक्कर देण्यासाठी एक स्टारकिड आला आहे. तो म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा मुलगा मिकाईल. तो देखील क्यूटनेसच्या बाबतीत तैमूरला चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. आयेशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती मिकाईलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Ayesha takia son mikail gives though competition to taimur ali khan)

फोटोमध्ये मिकाईल कधी खेळताना, तर कधी मस्ती करताना दिसत असतो. त्याचे हे फोटो सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांना खूप आवडत असतात. मिकाईलचा जन्म 2013 मध्ये झाला आहे. तो आता 7 वर्षांचा आहे. मिकाईलच्या जन्मानंतर आयेशाने चित्रपटसृष्टी सोडून दिली आहे. त्यानंतर ती परत कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. त्यानंतर तिने तिचा सगळा वेळ तिच्या मुलाला आणि कुटुंबाला दिला आहे. आता देखील तिचा संपूर्ण वेळ ती मुलाचे पालन पोषण करण्यात जात असतो.

आयेशाने समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीसोबत 2009 मध्ये लग्न केले आहे. लग्नानंतर तिने चित्रपटात काम करणे सोडून दिले होते. पण तिने त्यानंतर शेवटची ‘वॉंटेड’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तुझी- माझी जोडी लाखात एक! सुपरस्टार राम चरणकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; पत्नीचा आला ‘असा’ रिप्लाय

-भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीने बाथरूममध्ये केला आमिर खानच्या गाण्यावर डान्स; शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


Leave A Reply

Your email address will not be published.