Monday, September 25, 2023

रागात असलेल्या भुमीने जेव्हा आयुष्मान खुरानाला मारली होती ८ वेळा कानाखाली, मग अभिनेत्यानेही…

बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत राहतो. तसेच अभिनेत्री भुमी पेडणेकर सुध्दा दमदार अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते. चाहत्यांनाही या दोघांची जोडी प्रचंड आवडते. तसेच प्रेक्षकांना नेहमीच या दोघांचा चित्रपट पाहताना आनंद वाटतो आणि ते या दोघांना खूप प्रेम देतात. आयुष्मान खुरानाने २०१२मध्ये शुजीत सरकारचा रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट ‘विकी डोनर’ने आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. तर भूमी पेडणेकरने २०१५च्या ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. हा चित्रपट कदाचित भूमीसाठी पहिला चित्रपट असेल. मात्र, हा चित्रपट तिच्यासाठी स्मरणीय चित्रपट बनला. दिनांक ( १८जुलै) अभिनेत्री भूमी पेडणेकरचा वाढदिवस. जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील एक गाजलेला किस्सा. 

‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात भूमी पेडणेकरशी संबंधित एक मजेदार किस्सा घडला, जो वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दरम्यान, ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये भूमीला प्रचंड राग येतो आणि तिला अभिनेत्याच्या कानाखाली मारायची असते. ‘दम लगा के हईशा’ भूमीचा पहिला चित्रपट असल्याने, ती हा सीन करताना प्रचंड गडबडली होती. कारण तिला तिच्यापेक्षा सिनिअर अभिनेत्याला कानाखाली मारायची होती. यामुळे योग्य टायमिंगवर तिला कानाखाली मारता येत नव्हती आणि असे झाल्यामुळे बरेच टेक घ्यावे लागले. अखेर सहाव्या- सातव्या वेळी कानाखाली मारल्यानंतर आयुष्मानला गंमतीशीरपणे असे म्हणावे लागले की, “या सीनमध्ये भूमीला खूप आनंद वाटत आहे, म्हणुन ती हे मुद्दाम करत आहे.”

यानंतर आयुष्मान भूमीला असे काही बोलला, ज्यामुळे ती कानाखाली मारायला तयार झाली. भुमीने आधी १५ मिनिटे स्वतःला वेळ देण्यासाठी एकांतात थांबली आणि काही वेळानंतर सेटवर परत आल्यावर तिने एक शानदार शॉट दिला. पण या एक सीनसाठी तिने आयुष्मान खुरानाला एकदा नव्हे, तर ८ वेळा कानाखाली मारली होती. अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांसोबत पोस्ट शेअर करत राहते. त्याचबरोबर भूमी अनेकदा पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त करताना दिसते.

अधिक वाचा- 
सलमानच्या नावे फेक कॉल्स… भाईजानने दिला ‘हा’ थेट इशारा; वाचा काय घडले?
दीपा चौधरी हिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा

 

हे देखील वाचा