प्रेग्नंट नुसरत जहाँचा पाण्यात जलवा; स्विमिंग पूलमध्ये केले बोल्ड फोटोशूट


टीएमसी खासदार आणि बंगाल चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नुसरत जहाँ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिच्या चर्चेत येण्याचे कारण हे त्यांचे व्यावसायिक आयुष्य नसून, तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. वैयक्तिक जीवनातील तिचे लग्न, अफेअर आणि प्रेग्नेंसी या कारणांमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत तिने नुकतेच तिचे एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे.

स्विमिंग पूलमध्ये केलेल्या या फोटोशूटचे काही फोटो आणि तिचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पाण्यात वेगवेगळ्या पोझ देणारी नुसरत तिच्या या अवतारात अतिशय सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या नुसरतला सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून देखील ओळखले जाते. ती नेहमीच तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये नुसरतने अतिशय साधा मेकअप केला असला, तरीही तिच्या डोळ्यांना आकर्षक दाखवण्यासाठी डोळ्यांना हेवी मेकअप केला आहे. स्विमिंग पूलमध्ये पोझ देणाऱ्या नुसरतच्या या अदा घायाळ करणाऱ्या आहेत. काळ्या आणि निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नुसरत कमालीची खूपच सुंदर दिसत आहे. नुसरतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे. त्याने तिची ही पोस्ट शेअर करताना ‘जोखीम नाही, कहाणी नाही’, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

नुसरतने प्रसिद्ध व्यायवसायिक निखिल जैनशी तुर्कीच्या बोड्रम सिटी येथे हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनुसार लगीनगाठ बांधली होती. या १९ जूनला नुसरत आणि निखिलच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले. मात्र, मागच्या काही दिवसांपासून नुसरत आणि निखिल यांच्यात काहीच आलबेल नाहीये. बऱ्याच दिवसांपासून हे दोघं एकत्र देखील राहत नाहीये.

सध्या नुसरत गर्भवती असून तिच्या पती निखिलने सांगितले की, हे बाळ त्याचे नाही, तर नुसरत सध्या बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लोकांची मदत करता- करता सोनूने सुरू केले आपले सुपरमार्केट; १० अंड्यांवर मिळतेय ‘ही’ जबरदस्त ऑफर

-बापरे! एका वर्षात प्रभासने नाकारल्या होत्या, एक- दोन नाही, तर तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच्या जाहिराती

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.