Thursday, July 18, 2024

चक्क ७० वर्षीय मिथुन दासोबत भारती सिंगने केला रोमान्स, मिथुनदाची रिअक्शन होती बघण्यासारखी

प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंग (Bharati singh) आपल्या मजेशीर सूत्रसंचालनाने सध्या ‘हुनरबाज’ या कार्यक्रमात धमाल करत आहे. तिच्या हजरजबाबीपणामुले आणि सूत्रसंचालनाने या कार्यक्रमाची रंगत खूपच वाढली आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर सध्या भारती सिंग आणि मिथुन चक्रवर्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे अनेकांनी भारती सिंगला ट्रोल केल आहे. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभूच्या ‘O antava’ गाण्याने सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. अनेक लोक या गाण्यावर रिल्स बनवताना दिसत आहेत. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारसुद्धा सहभागी झाले आहेत. अनेकांनी यावर रिल्स बनवत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कॉमेडीयन भारती सिंगचाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे तिला ट्रोलही केले जात आहे.

या गाण्यामध्ये देवी श्री प्रसादच्या संगीतावर ज्याप्रमाणे समंथा अल्लू अर्जुनसोबत डान्स करताना दिसते, अगदी त्याचप्रमाणे भारती सिंग हुनरबाजच्या मंचावर प्रशिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या ७१ वर्षीय मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. यामध्ये तिच्या मादक, आणि घायाळ करणार्‍या अदा पाहायला मिळत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये ती आपल्या खास शैलीत मिथुन चक्रवर्तींसोबत डान्स करत आहे. भारतीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे. सोबतच कलर्स वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवरही हा व्हिडिओ शेअर केला करत ”मिथुन दा आणि भारतीच्या या व्हिडिओने तुमचाही उत्साह जागा केलाय का?” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ भारती सिंगच्या चाहत्यांना चांगलाच आवडला असून अनेकांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने यावर प्रतिक्रिया देताना “ग्रँड पा आणि ग्रँड मुलीची जोडी खूपच छान आहे” असे म्हणत भारतीचे कौतुक केले आहे. तर आणखी एकाने ”मिथुनदा घाबरले,” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर रेखा जैन नावाच्या एका युजरने ”ही कुठे पण, कोणासोबतही सुरु होते स्वतःच्या आरोग्याची नाही पण समोरच्याच्या वयाचा तरी मान ठेवत जा,” असा सल्ला भारतीला देत जोरदार ट्रोल केल आहे. दरम्यान या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अशाच संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

हेही वाचा : 

हे देखील वाचा