Monday, February 26, 2024

प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी वाराणसीतील हॉटेलमध्ये लावून घेतला गळफास

भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा दुबेबद्दल मोठी बातमी समाेर येत आहे. आकांक्षा दुबे हिचा मृतदेह एका हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आकांक्षा अवघ्या 25 वर्षांची होती आणि तिने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

आकांक्षा ही भदोही जिल्ह्यातील चौरी पोलीस स्टेशन हद्दीतील पारसीपूर येथील रहिवासी होती. ती भोजपुरी इंडस्ट्रीतील एक नावाजलेली अभिनेत्री होती. आकांक्षाने ‘वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की 2’ या सारख्या चित्रपटातून काम केले होते. अशात अभिनेत्रीने आत्म’हत्या करून सर्वांनाच धक्का दिला आहे. ही बातमी आल्यानंतर भोजपुरी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

कांक्षा दुबे तीन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाली हाेती. तिच्या आई-वडिलांना तिला आयपीएस अधिकारी बनवायचे होते, पण आकांक्षाची आवड नृत्य आणि अभिनयात अधिक होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhojpuriya Actors (@bhojpuriyaactors)

एका मुलाखतीदरम्यान भोजपूरी मनोरंजनसृष्टीत काम करणं सोपं नसल्याचं आकांक्षाने सांगितले हाेते. अशात काम मिळत नसल्याने आकांक्षा 2018मध्ये डिप्रेशनमध्ये गेली होती. यासाेबतच तिने भोजपुरी इंडस्ट्री साेडण्याचाही निर्णय घेतला हाेता. मात्र, आईच्या सांगण्यावरुन ती पुन्हा काम करण्यास तयार झाली होती. (bhojpuri actress akanksha dubey commits suicide)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राताेरात सुनील ग्रोव्हरला करण्यात आले रिप्लेस, रिजेक्शननंतर ‘अशी’ हाेती कॉमेडियनची अवस्था

बाॅलिवूडमध्ये शिल्पा शेट्टीपासून ते आमिर खानपर्यंत ‘या’ स्टार्सनी थेट चाहत्यांसाेबत थाटला संसार

हे देखील वाचा