उफ्फ! भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने दिली बोल्ड स्टाईलमध्ये पोझ, युजर्स म्हणाले ‘असे कसे चालेल…’


भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने (Monalisa) आजकाल आपल्या स्टाईलची जादू पसरवली आहे. तिला सोशल मीडियावर खूप पसंत केले जाते आणि ती वेळोवेळी तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. ख्रिसमसच्या निमित्ताने अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक दिसत आहे.

या फोटोंमध्ये मोनालिसाने जांभळ्या रंगाचा स्कर्ट आणि बदामी कलरचा टॉप घातला आहे. अभिनेत्रीचा हॉट लूकही तिच्या चाहत्यांना पसंत केला जात आहे. तिने या ड्रेसमधील अनेक फोटो तिचा अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोझ देताना दिसत आहे.

हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, “बी हॅप्पी, प्रीख्रिसमस #ख्रिसमस #वाईब्स.” याशिवाय अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर ख्रिसमसशी संबंधित इतरही अनेक फोटो पोस्ट केले आहेत. मोनालिसाच्या या फोटोंवर तिचे चाहते खूप प्रेम करत आहेत. त्यावर अनेक चाहत्यांनी हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत.

युजर म्हणाले, ‘असे कसे चालेल…’
मात्र, यादरम्यान एका युजरने कमेंट करत “असे कसे चालेल,” असा सवाल केला. त्याच वेळी, काही चाहत्यांनी फोटो अतिशय सुंदर असल्याचे वर्णन केले आहे. अभिनेत्रीच्या या इंस्टाग्राम पोस्टला चांगलीच पसंती मिळत आहे. फोटोंवर आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत, तर मोठ्या संख्येने युजर्सने कमेंटही केल्या आहेत.

नुकतेच मोनालिसाने तपकिरी रंगाचा ड्रेस परिधान केलेले आणखी काही फोटोही शेअर केले होते. डीप नेक लाइन असलेल्या या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड आणि हॉट दिसत होती. फोटो शेअर करताना मोनालिसाने कॅप्शन दिले की, “हॅलो, बुधवार. #ख्रिसमस #फिल #पार्टी #सेलीब्रेशन #स्टार्ट #हॅप्पी #रेड.”

मोनालिसाचे इंस्टाग्रामवर ४.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. भोजपुरी चित्रपटसृष्टीत मोनालिसाने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने १०० हून अधिक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत तिचे नाव सामील आहे. चाहते मोनालिसाच्या नवीन व्हिडिओ आणि फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!