भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीच्या ग्लॅमरस फोटोंचा सोशल मीडियावर राडा; वेधले चाहत्यांचे लक्ष


काळ बदलला तसे चित्रपटांचे रूपही बदलत गेले. पूर्वी फक्त विशिष्ट प्रांतासाठीच मर्यादित असणारे प्रादेशिक सिनेमे, कलाकार हे आजच्या आधुनिक जगात संपूर्ण देशात आणि जगात लोकप्रिय ठरले आहेत. हिंदी सिनेमे आणि कलाकार यांना हे प्रादेशिक कलाकार आणि सिनेमे जोरदार टक्कर देताना दिसतात.

यात भोजपुरी सिनेमा देखील मागे नाही. भोजपुरी गाणे, भोजपुरी कलाकार सध्या लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडच्या कलाकारांना देखील मागे टाकत आहेत. अशीच एक लोकप्रिय, बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे ‘क्वीन’ राणी चॅटर्जी. राणीने अनेक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले आहे. शिवाय ती सोशल मेडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. राणीने नुकतेच तिचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

राणी नेहमी तिच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. सध्या तिने वेस्टर्न अवतारातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. राणीला सोशल मीडियावर १४ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये राणी अतिशय मादक दिसत असून फॅन्स देखील तिच्या या लूकवर भरभरून कमेंट्स करत आहेत. मुख्य म्हणजे राणीने हे फोटोशूट तिच्या घराच्या टेरेसवर केले आहे.

‘ससुरा बड़ा पइसावाला’ या सिनेमातून राणीने भोजपुरी सिनेमामध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

राणीने मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ, पवन सिंह, खेसारी लाल यादव अशा मोठ्या भोजपुरी कलाकारांसोबत तिने काम केले आहेत. ती ‘खतरो के खिलाडी’ या रियॅलिटी शोमध्ये देखील दिसली आहे. तिला एकदा तरी सलमान खानसोबत काम करायचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.