Video: भोजपुरी स्टार समर सिंगचं ‘हे’ गाणं यूट्यूबवर घालतंय धुमाकूळ; तीनच दिवसात मिळाले २० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


भोजपुरी अभिनेता ‘समर सिंग’चा नुकताच रिलीझ झालेला चित्रपट ‘विरासत’ हा चित्रपटगृहात हाऊसफुल होत आहे. दुसरीकडे या चित्रपटाची गाणी यूट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. होळी संबंधित असलेल्या या भोजपुरी अभिनेत्याचे गाणे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या गाण्याचे बोल ‘भतार तोहर रोवत होई’ हे आहेत. हे गाणे ‘सारेगामा हम भोजपुरी’ या यूट्यूब अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहे. केवळ 3 दिवसाच्या आत या गाण्याला यूट्यूबवर 20 लाखांपेक्षा जास्त वेळा बघितले गेले आहे. समर सिंग व्यतिरिक्त ‘शिल्पी राज’ यांनी देखील या गाण्याला आपला आवाज दिला आहे.

या गाण्यात समर सिंग हे देशी लूकमध्ये आहेत आणि शिल्पी राज वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. हे गाणे ‘राज कुमार’ यांचा सुपरहिट चित्रपट ‘हीर रांझा’ मधील ‘मिलो ना तुम तो हम घबराये’ या गाण्यावर आधारित आहे. हिंदीमध्ये ‘लता मंगेशकर’ यांनी या गाण्याला गायले होते, तर ‘मदन मोहन’ यांनी संगीत दिले होते.

भोजपुरी मध्ये समर सिंग आणि शिल्पी राज यांनी हे गाणे गायले आहे. ‘आलोक यादव’ यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहेत. ‘डीआर आनंद’ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.